आमदार नितेश राणे यांची कणकवली पोलिसांकडून चौकशी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 03:31 PM2022-01-24T15:31:42+5:302022-01-24T15:32:40+5:30

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ल्या प्रकरणी चौकशी करिता आमदार नितेश राणे  सोमवारी दुपारी कणकवली पोलिस ठाण्यात उपस्थित राहिले. 

Kankavali police interrogates MLA Nitesh Rane | आमदार नितेश राणे यांची कणकवली पोलिसांकडून चौकशी!

आमदार नितेश राणे यांची कणकवली पोलिसांकडून चौकशी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

कणकवली: शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ल्या प्रकरणी चौकशी करिता आमदार नितेश राणे  सोमवारी दुपारी कणकवली पोलिस ठाण्यात उपस्थित राहिले. 

संतोष परब हल्ल्या प्रकरणी आमदार नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने देखील आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्याचा पर्याय आमदार राणे यांच्यासमोर आहे. मात्र, असे असतानाच २७ जानेवारीपर्यंत आमदार नितेश राणे यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे सरकार पक्षाच्यावतीने उच्च न्यायालयात सांगण्यात आले होते.

त्यामुळे आमदार नितेश राणे यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. या सर्व प्रकरणी पोलिसांकडून तपास  सुरू असताना  सोमवारी दुपारी सुमारे पाऊण तास आमदार नितेश राणे हे कणकवली पोलिस ठाण्यात चौकशीकरता उपस्थित राहिले होते. मात्र, पोलिसांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे नेमकी काय चौकशी केली ? याचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे वकील  ऍड. संग्राम देसाई हे देखील उपस्थित होते.

Web Title: Kankavali police interrogates MLA Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.