शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

केळशीचा गजानन संघर्ष विजेता

By admin | Updated: December 30, 2014 23:32 IST

दापोली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा; लाडघरला दुसऱ्या क्रमांकावर समाधान

आंजर्ले : दापोली तालुक्यातील आसूद येथे शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय खुल्या गटातील कबड्डी स्पर्धेत आकर्षक खेळ करत केळशीच्या गजानन संघर्ष संघाने श्री झोलाई देवी कबड्डी चषकावर आपले नाव कोरले. लाडघरच्या औदुंबर कबड्डी संघाला व्दितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.आसूद येथील शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या वतीने यावर्षी ग्रामदेवता श्री झोलाई देवीच्या नावाने कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती. विशेष म्हणजे सर्वच्या सर्व संघांनी या स्पर्धेत खेळून उपस्थित क्रीडा रसिकांचे मनोरंजन केले. सहभागी संघांवर मात करून श्री विठ्ठल कबड्डी संघ, पाळंदे, शिवसाई वणंद, औदुंबर लाडघर व गजानन संघर्ष, केळशी आदी संघांनी उपांत्य फेरीत धडक दिली.पहिल्या उपांत्य फेरीचा सामना विठ्ठल पाळंदे व गजानन संघर्ष, केळशी यांच्यात झाला. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात अखेरच्या काही क्षणात केळशी संघाने बहारदार खेळ करत पाळंदे संघावर विजय मिळवला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात वणंद व लाडघर या दोन्ही संघांनी आकर्षक खेळ करत उपस्थित कबड्डी रसिकांची मने जिंकली. शेवटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर लाडघरच्या चढाईपटूंनी आक्रमक खेळ करत सामना आपल्या बाजूने झुकविण्यात यश मिळवीत अंतिम फेरीत धडक मारली.अंतिम सामन्यात केळशीच्या व लाडघरच्या खेळाडूंकडून एकमेकांविरोधात आक्रमक व आकर्षक खेळ करत सामन्यात रंगत आणली. मध्यंतरापर्यंत आघाडीवर असणाऱ्या केळशी संघावर आक्रमण करत लाडघरच्या चढाईपटूनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र, या अटीतटीच्या झालेल्या सामन्यात त्यांना यश मिळवता आले नाही. केवळ एका गुणाने गजानन संघर्ष, केळशीने हा सामना जिंकला व श्री झोलाई देवी कबड्डी चषकावर आपले नाव कोरले.स्पर्धेच्या औचित्याने मंडळाकडून शिवशक्ती भूषण पुरस्कराचेही वितरण करण्यात आले. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गावातील शिक्षण क्षेत्रासाठी बाळ शिगवण, कृषी पर्यटनासाठी मंगेश बंडबे, आदर्श ग्रामस्थ म्हणून रवींद्र कुळे, त्रिवेणी मल्लखांब पथकाचे दिलीप बांद्रे, आर्मीतील योगदानासाठी संदेश चव्हाण, कबड्डी क्षेत्रातील सुनील जगदाळे, वैभव रेवाळे, केदार जगदाळे, वर्षा धामणे व सूरज बांदे्र यांना शिवशक्ती भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.यावेळी आसूद सरपंच विष्णू वारसे, रऊफ हजवाने, असलम अकबानी, बाळ शिगवण, रत्नागिरी-सिंधुदुर्ग तलाठी संघाचे अध्यक्ष दिलीप शिगवण, गाव अध्यक्ष वसंत शिर्के, अनंत बांद्रे, कानसे गुरूजी, राकेश माने, खेडेकर आदी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यशस्वीतेसाठी अध्यक्ष वसंत रोवले, प्रभाकर बांदे्र, कार्याध्यक्ष रघुनाथ चव्हाण, प्रशिक्षक पांडुरंग धामणे, मंगेश रेवाळे, योगेश कांगणे, प्रफुल्ल बांद्रे, विजय बांदे्र, स्वप्नीला कानसे, निवास बांदे्र, चंद्रकांत बांदे्र, चंद्रकांत बोथरे, सुभाष बांदे्र यांनी मेहनत घेतली. (वार्ताहर)