दिल्लीत मृत्यू झालेल्या मंडणगडातील जवानावर लाटवण येथे अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 07:25 PM2020-03-03T19:25:09+5:302020-03-03T19:30:28+5:30

दिल्लीतील दंगल बंदोबस्ताचा ताण आल्याने मंडणगड तालुक्यातील लाटवण येथील मुकेश नारायण कदम या जवानाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या जवानाचे पार्थीव मंगळवारी लाटवणला आणले असून, लाटवण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Jawana dies of heart attack in Delhi | दिल्लीत मृत्यू झालेल्या मंडणगडातील जवानावर लाटवण येथे अंत्यसंस्कार

दिल्लीत मृत्यू झालेल्या मंडणगडातील जवानावर लाटवण येथे अंत्यसंस्कार

Next
ठळक मुद्देदिल्लीत मृत्यू झालेल्या मंडणगडातील जवानावर लाटवण येथे अंत्यसंस्कारबंदोबस्ताचा ताण, पार्थिव गावी

मंडणगड : दिल्लीतील दंगल बंदोबस्ताचा ताण आल्याने मंडणगड तालुक्यातील लाटवण येथील मुकेश नारायण कदम या जवानाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या जवानाचे पार्थीव मंगळवारी लाटवणला आणले असून, लाटवण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सीएएवरून दिल्ली उसळलेल्या हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंदोबस्तासाठी भारतीय जवानांनाही तैनात करण्यात आले आहे. दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न करण्यात येत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सुरक्षा रक्षकही तैनात केले आहेत.

दिल्लीतील दंगल बंदोबस्तावर मंडणगड तालुक्यातील लाटवण येथील भारतीय सैन्यात कर्तव्य बजावणाऱ्या मुकेश नारायण कदम हेदेखील तैनात होते. मात्र, या दंगलीच्या बंदोबस्ताचा ताण पडल्याने मुकेश कदम यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

Web Title: Jawana dies of heart attack in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.