शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

जामदा प्रकल्पग्रस्त मागणी रेटणार !

By admin | Updated: February 19, 2015 23:44 IST

ग्रामस्थ आक्रमक : पुनर्वसन उपजिल्हाधिकारी आज घेणार बैठक

राजापूर : शासनाच्या पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी राऊत यांच्या उपस्थितीत काजिर्डा गावी जामदा प्रकल्पाबाबत २० रोजी बैठक पार पडत असून, त्यामध्ये समस्य प्रकल्पग्रस्त हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रद्द करा, अशी मागणी रेटून धरणार आहेत. समस्त ग्रामस्थांना धर्मराज्य शेतकरी संघटनेचा भक्कम पाठींबा आहे.मागील १९ वर्षे प्रकल्प मंजूर झाल्यानंतर त्या कालावधीत समाधानकारक काम मार्गी लागलेले नाही. पुनर्वसनाबाबत तर काहीच काम झालेले नाही. एकूणच ही प्रक्रियाच चुकीच्या पद्धतीने राबविली गेली, असा आरोप प्रकल्पग्रस्तातून करण्यात येत आहे. सुमारे ४१ कोटी खर्चाचा प्रकल्प ५१९ कोटींवर जाऊन पोहोचला. भूमी संपादन अधिनियमानुसार ८० टक्के ग्रामस्थांची संमती, ग्रामस्थांच्या जनसुनावणी व ठराव आवश्यक असतानाही, तसे काहीही न घडता मनमानीपणे लोकांच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या. त्यामुळे शासन जनतेला फसवत आहे. त्यामुळे मागील चार-पाच वर्षे प्रकल्पाचे काम पुनर्वसनावरुन स्थानिक ग्रामस्थांनी बंद पाडले होते. त्यामुळे संतापलेल्या प्रकल्पग्रस्तांनी आता हा प्रकल्पच रद्द करा, अशी मागणी प्रजासत्ताक दिनी गावात पार पडलेल्या शेतकरी धर्मपरिषदेत केली होती.दरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकरवी लावलेल्या चौकशीत जामदा प्रकल्पाचा समावेश आहे. त्यामुळे दोलायमान स्थितीत सापडलेल्या या प्रकल्पातील पुनर्वसनाबाबत जिल्ह्याचे पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी राऊत हे २० फेब्रुवारीला काजिर्डा गावी जाऊन बैठक घेणार आहेत.यापूर्वी काजिर्डावासियांनी धर्मराज्य शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली पुनर्वसन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. मात्र, त्यावेळी त्यांच्याकडून समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचे आरोप प्रकल्पग्रस्तांमधून करण्यात आले होते. परिणामी उद्याच्या बैठकीत पुनर्वसनाचा विषय शासनाने सोडून द्यावा व हा प्रकल्पच कायमचा रद्द करावा, अशी मागणी बैठकीत रेटून धरणार आहेत, अशी माहिती काजिर्डा उपसरपंच अशोक आर्डे यांनी दिली. कोणत्याही परिस्थितीत काजिर्डा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, यासाठी धर्मराज्य शेतकरी संघटनेसह काजिर्डावासिय एकवटले आहेत. त्यामुळे उद्याच्या बैठकीत समस्त प्रकल्पग्रस्त कशा प्रकारे विरोध करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उपस्थित पुनर्वसनाचे उपजिल्हाधिकारी राऊत कोणती भूमिका घेतात, हा देखील महत्तवाचा मुद्दा ठरणार आहे. (प्रतिनिधी)