शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

जाधव-कदम वादात चिपळूणची वाट लागली

By admin | Updated: November 4, 2015 00:08 IST

राजू देवळेकर : सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयच नसल्याची बोचरी टीका

चिपळूण : राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्यातील वादामुळे शहराच्या विकासाची वाट लागली आहे, असा आरोप करतानाच सत्ताधाऱ्यांमध्ये अनेक भानगडी आहेत. त्यांच्यात समन्वय नसल्याने ते कोणतीही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत, असे नगर परिषदेचे गटनेते राजू देवळेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांचे विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. याचा गांभीर्याने विचार करुन नियोजन करण्याची मानसिकता सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. त्यांच्यामध्ये भानगडी सुरु आहेत. आपापसात आरोप-प्रत्यारोप करण्यात ते गुंतले आहेत. गेले आठ महिने विकासाकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकही हैराण झाले आहेत. आम्ही विरोधक असलो तरी केवळ विरोधाला विरोध करत नाही. सत्ताधाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करू, शहराचा विकास करण्यावर आमचा भर आहे. परंतु, सत्ताधारीच हतबल असल्याने विकास खुंटला आहे, असेही देवळेकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला नगरसेवक शशिकांत मोदी, माधुरी पोटे, सुनील कुलकर्णी, राकेश देवळेकर, यतीन कानडे, विकी नरळकर आदी उपस्थित होते. शहर विकासासाठी आम्ही सत्ताधाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले. आवश्यक तेथे नागरिकांच्यावतीने आवाज उठवला, तीव्र विरोध केला. विविध विकासकामांसाठी सत्ताधाऱ्यांबरोबर चर्चा केली. शिष्टमंडळेही नेली. तरीही त्यांच्यामध्ये फरक नाही. आता यांच्यापुढे काय करायचे, हा प्रश्न आहे. विकासाचा पाठपुरावा करुन प्रलंबित प्रकल्प मार्गी लावले पाहिजेत. खासदार विनायक राऊत रामतीर्थ तलावाच्या सुशोभिकरणासाठी निधी देणार आहेत. तीन महिने झाले तरी त्याबाबत कोणत्याही हालचाली नाहीत. आता सत्ताधाऱ्यांनी पत्र मागितल्यामुळे आम्ही पत्रही दिले आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी पालिकेला भेट देऊन निधी देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी आवश्यक ते प्रस्ताव त्यांनी मागितले आहेत. परंतु, कौन्सिलमध्ये त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडताना त्यांनी चालढकल केली, हे शोभादायक नाही. इनायत मुकादम यांच्याबाबतचा प्रकार हा शहराला काळिमा फासणारा आहे. ते सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक असताना त्यांच्यावर कारवाई व्हावी, हे अयोग्य वाटते. नगरसेवक लियाकत शाह यांना व्हीप बजवावा लागतो. सदस्यांवर सत्ताधाऱ्यांचा अंकुश राहिला नाही. अनेक प्रकल्पांची कामे रखडलेली आहेत. नागरिकांना हे माहीत आहे. सत्ताधाऱ्यांनी एकही विकासकाम केले नसल्याने ताबडतोब खुर्च्या खाली व सत्ता सोडा, असे आव्हान देवळेकर यांनी दिले आहे. (प्रतिनिधी)गटनेते असूनही आपण पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या बैठकीला नगर परिषदेत उपस्थित राहिला नाहीत, असे विचारता ते म्हणाले, याबाबतचा खुलासा माझे वरिष्ठ नेते करतील, तर शहरप्रमुख म्हणून आपली निवड झाल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी आपल्याविरोधी तक्रार केली आहे, असे निदर्शनास आणता तसे काही नाही, असेही देवळेकर यांनी स्पष्ट केले.