शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या गुंतवणूकदारांचीही चौकशी

By admin | Updated: June 24, 2014 01:42 IST

‘सॅफरॉन’प्रश्नी उदय सामंत यांची घोषणा

रत्नागिरी : सॅफरॉन कंपनीत नागरिकांना पैसे गुंतविण्यासाठी भाग पाडणाऱ्या मध्यस्थांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. पण, ज्यांनी जादाचे पैसे या कंपनीत गुंतविले, ते पैसे कोठून आले, याचीही चौकशी होणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी जनता दरबाराविषयी माहिती देण्याकरिता आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सहावा जनता दरबार आयोजित केला होेता. या जनता दरबारात एकूण ३० तक्रार अर्ज दाखल झाले. सध्या सॅफरॉन कंपनीतील गोंधळ गाजत आहे. रत्नागिरीकरांच्या फसवणुकीबाबत पोलिसांची भूमिका काय, असा सवाल करणारा अर्ज या जनता दरबारात सादर झाला. याबाबत पालकमंत्री म्हणाले की, या कंपनीबाबत सव्वा वर्षापूर्वी पोलिसांकडे लेखी तक्रार आली होती. मात्र, त्याबाबत कारवाई का झाली नाही, याची चौकशी होईलच. पण या कंपनीकडे पैसे गुंतविण्यासाठी ज्या मध्यस्थांनी लोकांना प्रवृत्त केले, त्यांचीही चौकशी होऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले असल्याचे सामंत म्हणाले. याप्रकरणी पोलीस आराखडा तयार करणार असून, त्यात अधिकचे पैसे भरणाऱ्यांनी ते कुठून आणले, त्याचीही चौकशी होणार असल्याची माहितीही दिली. अतिरिक्त शिक्षक बदल्यांबाबत या ३२१ शिक्षकांमध्ये तसेच ७४ निम्नशिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे, ते केवळ १ मार्च २०१४ च्या अध्यादेशाची अंमलबजावणी योग्यरित्या न झाल्यामुळे. परंतु या शिक्षकांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही, अशी ग्वाही सामंत यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या शाळांना पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्यात आल्याने आता या शिक्षकांना यात संधी मिळणार आहे. तसेच ७४ निम्नशिक्षकांना तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार असल्याची माहितीही सामंत यांनी दिली. यासंदर्भात ३० रोजी शिक्षण उपसंचालक रत्नागिरीत येणार असून, त्यांच्याशी चर्चा होणार असल्याचेही सामंत म्हणाले. यावेळी काही खासगी शाळा अवास्तव शुल्क वाढ करतात, अशा शाळांच्या पालकांनी रितसर तक्रार केल्यास त्या शाळांवर कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असल्याचे यावेळी पालकमंत्री यांनी सांगितले. सेतूतील प्रलंबित दाखल्यांचा निपटारा करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत दर आठवड्याला आता दाखल्यांच्या निपटाऱ्याबाबत आढावा घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. तसेच सध्या शाळा, महाविद्यालये येथे शिबिरे घेऊन दाखले दिले जात असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)