शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

प्री, पोस्ट वेडिंंगवर लक्षवेधी छायाचित्र

By admin | Updated: November 15, 2015 23:56 IST

परेश राजिवले : रत्नागिरीत भरणार आगळे प्रदर्शन

रत्नागिरी : छायाचित्र हे आपल्या जीवनातून निसटून जाणाऱ्या आणि खऱ्या क्षणांचे सोबती असतात. आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण अगदी आधुनिक पद्धतीने चित्रीत केल्यामुळे त्यातील प्रेम आणि आनंद द्विगुणित होत असतो. अर्थात ते काम छायाचित्रकाराचे असते. अशाच वेगळ्या पद्धतीने प्री आणि पोस्ट वेडिंंगवर आधारित छायाचित्रण करणाऱ्या परेश राजिवले या तरुणाने आपली वैविध्यपूर्ण फोटोग्राफी प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांसमोर आणली आहे.पऱ्याची आळी येथील सोहम् आर्केड अपार्टमेंटमध्ये असलेल्या आपल्या स्मार्ट फोटो स्टुडिओमध्ये त्याने हे प्रदर्शन १७ नोव्हेंबर रोजी आयोजित केले आहे. आज फोटोग्राफीमध्ये अत्याधुनिक साधनसामुग्री, अद्ययावत कॅमेरे आणि नव्या प्रकारच्या लेन्सने बहर आणली आहेत. योग्य ज्ञान, वैविध्यपूर्ण अँगल्स, नवनिर्मिती आणि नवसंकल्पना या सर्व गोष्टी घेऊन परेश राजिवले या तरुणाने फोटोग्राफी क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. स्टुडिओच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त परेशने प्री वेडिंंग आणि पोस्ट वेडिंग अशा विषयाचे एक आगळे प्रदर्शन भरवले आहे. विविध मूडमध्ये हे फोटो टिपण्यात आल्याने दर्शक हे विविध फोटो पाहण्यात गुंग होउन जातो.नव्या जमान्यानुसार आजची पिढी लग्नाआधीचेही सोबतचे सुखद क्षण कॅमेऱ्याद्वारे टिपून अविस्मरणीय करू इच्छिते. तसेच लग्नावेळची आणि लग्नानंतरचेही जवळीकतेचे क्षण त्यांना अलबमद्वारे कायमचे जपून ठेवायचे असतात. म्हणूनच प्री आणि पोस्ट वेडिंग हा उत्तम पर्याय असू शकतो. याच विषयावर छायाचित्र प्रदर्शनाद्वारे परेश आपली वेगळी फोटोग्राफी रत्नागिरीकरांसमोर ठेवणार आहे. परेशने प्री वेडिंंग व पोस्ट वेडिंंग संकल्पनेलाही रत्नागिरीत वेगळा आयाम दिला आहे. रत्नागिरीतील पर्यटनस्थळांना त्याने या नवदाम्पत्यासोबत टिपून एक रत्नागिरीच्या पर्यटनालाही खुलविण्याचा प्रयत्न केला आहे.याचबरोबर नवदाम्पत्याच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव टिपण्याबरोबर त्यांचे वैविध्यपूर्ण अँगल्सने टिपलेले फोटो अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या प्रदर्शनात परेश असे खास फोटो मांडणार आहे. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते १० यावेळेत हे प्रदर्शन समस्त रत्नागिरीकरांसाठी खुले असणार आहे. (प्रतिनिधी)