शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

‘चेस इन स्कूल’चा उपक्रम

By admin | Updated: December 25, 2015 00:39 IST

चैतन्य भिडे : ५० हजार विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण

रत्नागिरी : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे राज्यातील एक हजार शाळांमध्ये ५० हजार विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचे प्राथमिक शिक्षण देण्यात येणार आहे. रत्नागिरीतही गेली तीन वर्षे चेसमन संघटनेतर्फे हा उपक्रम सुरु असून, आतापर्यंत ४०० विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले आहे. शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार असून, त्यासाठी प्रशिक्षकाची आवश्यकता असल्याची माहिती चेस इन स्कूलचे जिल्हा संघटक चैतन्य भिडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.बुद्धिबळ शिकण्याचे व खेळण्याचे अनेक फायदे आहेत. विशेषत: लहान वयात हा खेळ गिरविल्यास मुलांना संयम, एकाग्रता, निर्णयक्षमता वाढवण्याबरोबर चुकलेल्या निर्णयाची स्वत: जबाबदारी स्वीकारण्याची जाणीव विकसित होण्यास मदत होऊ शकते. याशिवाय कल्पनाशक्ती, लढण्याची जिद्द, स्वतंत्र विचार करण्याची सवय आदी अनेक गुण विकसित केले जाऊ शकतात. चेसमन इन स्कूल या प्रकल्पामध्ये गेल्यावर्षी राज्यातील २३५ शाळांचे १२ हजार ५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. येत्या शैक्षणिक वर्षामध्ये एक हजार शाळांमध्ये जाऊन ५० हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. प्रथम तीन वर्षे चेस इन स्कूलची वाटचाल ग्रॅण्डमास्टर अभिजीत कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यावर्षीपासून सांगलीचे गिरीष चितळे यांनी चेस इन स्कूलच्या कमिशनर पदाची धुरा सांभाळली आहे.यावेळी चेसमनचे अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर, दिलीप टिकेकर, मंगेश मोडक, विवेक सोहनी, राधा देवळे, सौरभ देवळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)