शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

बारसू येथे औद्योगिक प्रकल्प उभारावा : प्रकाश गुरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST

राजापूर : राज्य शासनाच्या शिफारशीनुसार बारसू, सोलगाव, गोवळ आणि देवाचेगोठणे या भागात एमआयडीसीसाठी २,३०० एकर जमिनीची अधिसूचना काढण्यात आली ...

राजापूर : राज्य शासनाच्या शिफारशीनुसार बारसू, सोलगाव, गोवळ आणि देवाचेगोठणे या भागात एमआयडीसीसाठी २,३०० एकर जमिनीची अधिसूचना काढण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष व माजी सभापती प्रकाश गुरव यांनी प्रांताधिकारी यांना ऑगस्ट २०२०मध्येच दिलेल्या निवेदनात स्थानिक पातळीवरील शेतकरी व ग्रामस्थांना आपल्या मागण्यांबाबत शासनाशी चर्चा करण्यासाठी समितीला विश्वासात घेण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

औद्योगिक विकास महामंडळ बारसू, स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश गुरव यांनी उपविभागीय अधिकारी, राजापूर यांच्याकडे सोलगाव, बारसू येथील औद्योगिक प्रकल्पालगतची जमीन समाविष्ट करून घेण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली आहे. दरम्यान, जाहीर करण्यात आलेले औद्योगिक क्षेत्र मुख्य रस्त्यापासून चार किलोमीटर आत असून, मुख्य रस्त्यापासून चार किलोमीटर अंतरापर्यंतच्या जमिनी प्रकल्पात घेतल्यास जागामालक शेतकरी जमीन देण्यास तयार आहेत, अशी ग्वाही या निवेदनाद्वारे प्रांताधिकारी तथा शासनाला देण्यात आली आहे. या निवेदनासोबत प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला एकरी किती मिळणार आहे? याचा शासनाकडून खुलासा मागविण्यात आला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन प्रकल्पाला जाणार आहे, त्यांना प्रकल्पग्रस्त दाखला देण्याची विनंती करण्यात आली आहे. समन्वय समितीने दिलेल्या निवेदनावर सोलगाव, गोवळ, बारसू, कोंडसर, शेढे, कोदवली, देवाचेगोठणे, धोपेश्वर येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्या सह्या आहेत. याच निवेदनात प्रकल्पांतर्गत बाधित गावातील तरुणांना प्रशिक्षण व प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्याची मागणी केली आहे. तसेच परिसरात सुसज्ज हॉस्पिटल, शैक्षणिक सुविधा व टेक्निकल कॉलेजची मागणीही केली आहे.

----------------------------

साेलगाव ग्रामपंचायतीचा रिफायनरीला पाठिंबाच

औद्योगिक क्षेत्रात जात असलेल्या काही क्षेत्रांचा वारस तपास रखडला आहे. असे वारस तपास तत्काळ करण्यात यावेत. स्थानिकांच्या या मागणीमुळे एमआयडीसी अंतर्गत येणाऱ्या औद्योगिक प्रकल्पांना आता वाट मोकळी झाली आहे. सोलगाव ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीतील २६ नंबरला नोंद असलेले सार्वजनिक रस्ते खडीकरण व डांबरीकरणासाठी १९ फेब्रुवारी २०१९ रोजी आरआरपीसीएल कंपनीशी पत्रव्यवहार केलेला आहे. सोलगाव सरपंचानी दिलेल्या या पत्रात राजापूर तालुक्यात होत असलेला प्रकल्प येथेच व्हावा, यासाठी आमच्या ग्रामपंचायतीची संमती व पूर्ण पाठिंबा असल्याचे पत्र देण्यात आले आहे.