पेंढाबे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:25 IST2021-05-03T04:25:12+5:302021-05-03T04:25:12+5:30

अडरे : चिपळूण तालुक्यातील पेढांबे येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून, चिपळूण तालुक्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, कोरोनाचा वाढता ...

Inauguration of Pendhabe Covid Care Center | पेंढाबे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

पेंढाबे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

अडरे : चिपळूण तालुक्यातील पेढांबे येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून, चिपळूण तालुक्यात कोरोनाची वाढती

रुग्णसंख्या, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि बेड्सची कमतरता हे सगळे बघता मंदार एज्युकेशन सोसायटी संचलित, श्री साईश्रद्धा कोविड केअर सेंटर, पेढांबे येथे पेड कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले.

डॉ. स्वाती सागर, डॉ. रणजित पाटील, डॉ. हर्षद होन, डॉ. गौतम कुलकर्णी, डॉ. नितीन पाटील, डॉ. ओंकार जंगम, डॉ. दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे कोविड सेंटर चालणार आहे.

यावेळी आमदार शेखर निकम, जिल्हा नियोजन सदस्य दादा साळवी, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी ज्योती यादव, माजी सभापती सुरेश खेतले, पंचायत समितीचे माजी सदस्य रमेश राणे, इक्बाल मुल्ला, भाऊ मोहिते, सरपंच मयुर खेतले, पोलीसपाटील सुधाकर शिंदे, श्रीधर शिंदे, माजी सरपंच नीलेश कदम, बाळा शिंदे उपस्थित होते.

Web Title: Inauguration of Pendhabe Covid Care Center