... तर 18 जणांचा जीव वाचला असता, फेब्रुवारी महिन्यातच दिली होती तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 01:50 PM2019-07-05T13:50:20+5:302019-07-05T13:52:35+5:30

तिवरे (भेदवाडी) येथील रहिवासी असलेल्या अजित चव्हाण यांनी ही तक्रार दिली होती.

If take action of complaint, then could be save 18 life of tiware dam breached incident | ... तर 18 जणांचा जीव वाचला असता, फेब्रुवारी महिन्यातच दिली होती तक्रार

... तर 18 जणांचा जीव वाचला असता, फेब्रुवारी महिन्यातच दिली होती तक्रार

Next

रत्नागिरी - तिवरे धरण रात्री नऊच्या सुमारास फुटलं. त्यामध्ये 24 जण वाहून गेले. आतापर्यंत 18 जणांचे मृतदेह हाती लागले असून एकजण जिवंत आढळले आहेत. तर इतरांचा शोध सुरू आहे. धरण फुटल्यामुळे 13 घरं वाहून गेल्यानं वित्तहानीदेखील झाली आहे. धरण दुरुस्तीचा प्रस्ताव लालफितीत अडकला नसता, तर हा अनुचित प्रकार टाळता आला असता. तसेच, धरणाला पडलेल्या भगदाडीच्या तक्रारीची दखल घेतली असती, तर 18 जणांचा जीव वाचला असता. 

तिवरे धरण फुटीच्या अगोदरच या धरणाला भगदाड पडल्याची तक्रार चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आली होती. तिवरे (भेदवाडी) येथील रहिवासी असलेल्या अजित चव्हाण यांनी ही तक्रार दिली होती. विशेष म्हणजे 11 फेब्रुवारी रोजीच ही तक्रार देण्यात आली होती. त्यावेळी, नुकतीच उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने पाण्याचा साठी आणि विसर्ग नसल्याचाही उल्लेख या तक्रारीत करण्यात आला होता. तसेच, आगामी काळातील पावसाळा लक्षात घेता, लवकरात लवकर या धरणाला पडलेल्या भगदाडासंदर्भात आवश्यक त्या सूचना करण्याचेही चव्हाण यांनी तक्रारीत म्हटले होते. मात्र, नेहमीप्रमाणेच सरकारी कार्यालयाचा ढिसाळपणा अन् अधिकाऱ्यांची अनास्था या दुर्दैवी घटनेला कारणीभूत ठरली आहे. 

दरम्यान, तिवरे धरणाला दुरूस्तीची गरज असल्याचं आधीच लक्षात आलं होतं. खासदार विनायक राऊत यांनी त्याची दखल घेत या कामाकडे लक्ष देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली होती. त्यावेळी माती टाकून दुरूस्ती करण्याचा प्रयत्न झाला. धरण दुरूस्तीसाठी निधीचा प्रस्ताव आधीच पाठवण्यात आला होता. तो निधी वेळेत मिळाला असता तर, सर्व ग्रामस्थांचे प्राण वाचले असते

काळ आला होता पण...
काळ आला होता पण वेळ आली नव्हती, देवाचा धावा केल्यानेच वाचलो, अशी प्रतिक्रिया या संकटातून बचावलेल्या अरूण पुजारी यांनी बोलून दाखविली. पुजारी हे मूळचे मालवण तोंडवली येथील असून त्यांनी तिवरे गावामध्ये भेंदवाडी येथे मजबूत दोन मजली घर बांधले आहे. स्लॅबच्या असलेल्या या घराच्या मध्यभागी या पाण्याचा मारा होत होता. मात्र आपण वरच्या मजल्यावर असल्याने सुखरुप राहिलो. नजरेसमोरुन पाण्याचा मोठा प्रवाह तासभर वाहत होता. हे भीतीदायक चित्र पाहताना आपणदेखील मनाची तयारी केली होती. मात्र सुदैवाने घराचा मागील कोपरा पाण्याच्या माऱ्यामुळे तुटून गेला. स्लॅबच्या घरामुळे आपण वाचल्याचे त्यांनी सांगितले.
 

Web Title: If take action of complaint, then could be save 18 life of tiware dam breached incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.