शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

‘तिचा’ मृत्यू संशयास्पद

By admin | Updated: October 16, 2015 22:45 IST

कुडोशीतील घटना : भावांनी मागितला न्याय

खेड : तालुक्यातील कुडोशी गावात भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या रेश्मा शंकर चव्हाण हिचा मोहाने गावातील मंगेश साबळे यांच्या घरी झालेला मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप तिचा भाऊ प्रथमेश आणि दिलीप चव्हाण यांनी केला आहे. या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली असून, त्याबाबतचे निवेदन खेडचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे.मयत रेश्मा चव्हाण हिचा १० आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद खेड पोलिसात करण्यात आली आहे़ याबाबत तिचा भाऊ प्रथमेश आणि दिलीप चव्हाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात तिच्या मृत्यबाबत संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे़ मयत रेश्मा शंकर चव्हाण ही विवाहीत असून, तिला ११ वर्षाचा मुलगा आहे. काही वर्षापूर्वी रेश्मा आणि तिचे भाऊ असे कुटुंब मोहाने येथील मंगेश साबळे यांच्या घरी भाड्याने राहत असत़ त्यावेळी मंगेश साबळे हा रेश्मा हिच्याकडे वाईट नजरेने पाहत असे़ त्याचा संशय आल्याने ते घर या कुटुंबाने सोडले व त्यानंतर ते मोहाने येथील सुरेश कदम यांच्या जनावरांच्या गोठ्यात रहायला गेले. तर त्यांची बहीण रेश्मा ही आपल्या मुलासह मंगेश साबळे यांच्या सांगण्यावरून कुडोशी गावातील एका इसमाच्या घरी भाडयाने राहायला गेली़ त्यानंतर रेश्मा आणि तिचे भाऊ यांचे एकमेकांच्या घरी येणे - जाणे सुरू होते. विशेष म्हणजे मंगेश साबळे याने शनिवार १० आॅक्टोबर २०१५ रोजी रेश्मा हिला त्याच्या मोहाने गावातील घरी बोलावून घेतले होते़ या दिवशी रेश्मा ही मंगेश साबळे यांच्या घरी वास्तव्यास होती़ त्याच दिवशी तिचा मृत्यू सायंकाळी ७.३० वाजता झाल्याची नोंद खेड पोलिसात करण्यात आली आहे़ मात्र, आपले घर हाकेच्या अंतरावर असतानाही मंगेश साबळे याने आम्हाला रात्री ९.३० वाजता कळवले़ यावेळी तुमची बहीण कशीतरी करतेय, असे सांगितले़ तिथे जाऊन पाहिले असता आपली बहीण रेश्मा ही मंगेश साबळे यांच्या घराच्या पडवीच्या दर्शनी भागातील पायरीवर निपचीत पडली होती. आपण पोहोचण्याच्या आतच तिथे मोहाने गावचे पोलीसपाटील प्रवीण काणे उपस्थित होते़ तर काही मिनीटातच कळंबणी रूग्णालयाची रूग्णवाहिका आणि डॉक्टरही हजर झाले़ ही सारी परिस्थिती संशयास्पद असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)निवेदन सादर : चौकशीची मागणीखेड तालुक्यातील कुडोशी येथील रेश्मा चव्हाण हिच्या मृत्यूबाबत तिच्या भावांनी साशंकता व्यक्त केल्याने या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले आहे. आपल्या बहिणीचा मृत्यू संशयास्पद असल्याचे निवेदन तिच्या भावांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहे. या निवेदनाद्वारे या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.तक्रारीला टाळाटाळ१३ आॅक्टोबर २०१५ रोजी याबाबतची तक्रार खेड पोलिसात देण्यास गेलो असता आंबवली बीटच्या कर्मचाऱ्यांनी तक्रार घेतली नसल्याचा आरोप केला.