खेडमध्ये साडेतीन लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST2021-07-03T04:20:51+5:302021-07-03T04:20:51+5:30

खेड : मुंबई - गोवा महामार्गावर २ जून रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी एक तवेरा मोटार गुटखा वाहतूक ...

Gutka worth Rs 3.5 lakh seized in Khed | खेडमध्ये साडेतीन लाखांचा गुटखा जप्त

खेडमध्ये साडेतीन लाखांचा गुटखा जप्त

खेड : मुंबई - गोवा महामार्गावर २ जून रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी एक तवेरा मोटार गुटखा वाहतूक करताना ताब्यात घेतली. या कारवाईत सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचा गुटखा ताब्यात घेतला आहे. ही कारवाई तालुक्यातील भरणे नाका येथे करण्यात आली.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तवेरा मोटार (एमएच ०८, आर८२९५) मधून तौफिक रजाक मेमन (३२, रा. हर्णै, ता. दापोली) हा गुटख्याची वाहतूक करत हाेता. याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी दुपारी सापळा रचून पकडले. त्याच्या गाडीमध्ये सुमारे ३ लाख ४३ हजार रुपये किमतीचा आरएमडी व विमल गुटखा आढळला. हा गुटखा दापोली तालुक्यातील हर्णै येथे विक्री करीता घेऊन जात हाेता. ही कारवाई पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद, पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस स्थानकाचे तपास पथकप्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, पोलीस नाईक वीरेंद्र आंबेडे, शिपाई साजिद नदाफ, अजय कडू, संकेत गुरव यांच्या पथकाने केली.

---------------------------------------

खेड तालुक्यातील भरणे येथे पोलिसांनी कारवाई करून लाखो रुपयांच्या गुटख्यासह एकाला ताब्यात घेतले.

Web Title: Gutka worth Rs 3.5 lakh seized in Khed