शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण करताना स्थानिकांना प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क देवरुख : संगमेश्‍वर तालुक्‍यातील निवे प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करताना स्थानिक सोडून बाहेरच्या लोकांनाच प्राधान्य देण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

देवरुख : संगमेश्‍वर तालुक्‍यातील निवे प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करताना स्थानिक सोडून बाहेरच्या लोकांनाच प्राधान्य देण्यात येत असल्याने भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रूपेश कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे. स्थानिकांना आधी प्राधान्य द्या नंतर बाहेरच्यांना लस द्या, असे सांगत कारभार सुधारला नाही तर याविरोधात वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेचे युवा कार्यकर्ते सचिन मांगले यांनीही आज याच कारणावरून संबंधित आरोग्य केंद्राच्या अधिकारी आणि कर्मचारी यांची झाडाझडती घेतली.

देवरूख - मार्लेश्वर मार्गावर असलेल्या निवे प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले काही दिवस या केंद्रांतर्गत येणारी १६ गावे वगळता बाहेरून येणारी माणसे अधिक लस घेत असल्याची तक्रार होती. स्थानिक लोकप्रतिनिधींचा एक नातेवाईक तालुकास्तरावरून वैद्यकीय अधिकारी यांच्यावर दबाव आणत हे काम करीत असल्याच्या तक्रारी होत्या. शुक्रवारीही तसाच प्रकार घडल्यावर भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रूपेश कदम यांनी या केंद्राला भेट दिली. त्यावेळी स्थानिक वगळता केंद्राशी संबंध नसलेल्या भलत्याच गावातील नागरिक लसीकरणात आघाडीवर होते. याबाबत त्यांनी केंद्रात जाब विचारला असता त्यांना योग्य उत्तरे देण्यात आली नाहीत. शेवटी त्यांनी या केंद्रात जी गावे येतात तिथले नागरिक लसीकरणासाठी माेठ्या आशेने इथे येतात त्यांना प्राधान्य द्या आणि उरलेले डोस इतरांना द्या, अशी मागणी केली.

यानंतर त्यांनी देवरूख गटविकास अधिकारी यांच्याशीही दूरध्वनीवरून संपर्क साधून ही गोष्ट कानावर घातली. यात सोमवारपासून सुधारणा न झाल्यास याविरोधात वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. जिल्हा परिषद गटातील स्थानिक लोकप्रतिनिधीचा एक नातेवाईक जर असे प्रकार करणार असेल तर स्थानिक जनता ते खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. संगमेश्‍वर तालुक्‍यातील बहुतांशी आरोग्य केंद्रात सध्या हीच स्थिती असून, स्थानिक वगळून अन्य भागातील प्रतिष्ठितांना लस देण्याचे प्रमाण वाढले आहे. संगमेश्‍वरचे सभापती जयसिंग माने यांनी या गोष्टीत लक्ष घालून यामध्ये सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.