शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

कंदिलाच्या उजेडात करावे लागतायत अंत्यसंस्कार- स्मशानभूमीच्या मरणयातना...

By admin | Updated: August 5, 2014 00:09 IST

चाफळवासीयांची कुचंबना :

हणमंत यादव - चाफळ , येथील स्मशानभूमी शेडची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तसेच येथे विजेचीही सोय नाही. त्यामुळे ग्रामस्थांना रात्रीच्यावेळी कंदील, बॅटरी अथवा दिव्याच्या उजेडात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. परिणामी, चाफळवासीयांना मरणानंतरही मरणयातना सोसाव्या लागत आहेत. ग्रामपंचायतीसह, लोकप्रतिनीधींनी याकडे कानाडोळा केल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. चाफळची राजकीय सत्तास्थाने परस्पर विरोधी गटांमध्ये विभागलेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य म्हणून राजेश पवार तर जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून डी. बी. वेल्हाळ हे देसाई गटाचे नेतृत्व करत आहेत. ग्रामपंचायतसुध्दा देसाई गटाच्याच ताब्यात आहे. असे असताना या दोन्ही नेत्यांना स्वत:च्या गावातील स्मशानभूमी शेडसाठी निधी मिळवता येत नसल्याने विभागात हा विषय चर्चेचा ठरू लागला आहे. सध्या येथील स्मशानभूमी शेडचा पत्रा पूर्णपणे सडला आहे. त्यामुळे स्मशानभूमीत पाणी साचत आहे. यातच पावसात अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था होऊन परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथे पाण्यासह विजेची सोय नाही. ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेमार्फत सौरऊर्जा दिवे देण्यात आले होते, मात्र याठिकाणी एकही सौरदिवा न बसविल्याने रात्रीच्या वेळी ग्रामस्थांना रॉकेलचे दिवे बनवून अंत्यविधी करावा लागत आहे. नवीन स्मशानभूमी शेडसह सोईसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. ग्रामपंचायतीसह या दोन्ही लोकप्रतिनिधींनी स्मशानभूमी शेडसाठी निधीची तरतूद करुन रस्ता, वीज, पाण्याची स्वतंत्र व्यवस्था, नातेवाइकांना थांबण्यासाठी इमारत बांधून परिसरात वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.- धोंडिराम हिंंदोळे,  ग्रामस्थसातारा जिल्ह्यात आजही अनेक गावांमध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यविधी करताना ग्रामस्थांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात तर अडचणींमध्ये आणखीनच भर पडते. खाचखळग्यांनी भरलेला रस्ता, कोसळणारा पाऊस, ना विजेची सोय ना निवारा अशा दिव्यातून नदीकाठी जाऊन भरपावसात उघड्यावर अग्निसंस्कार करावा लागतो. विविध गावच्या स्मशानभूमींच्या अशा प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारी ‘स्मशानभूमीच्या मरणयातना’ ही मालिका ‘लोकमत’ आजपासून सुरू करीत आहे.