जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा स्नेहा सावंत यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:32 IST2021-05-10T04:32:05+5:302021-05-10T04:32:05+5:30

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान सदस्या स्नेहा सुकांत सावंत यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने ...

Former Zilla Parishad president Sneha Sawant passes away | जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा स्नेहा सावंत यांचे निधन

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा स्नेहा सावंत यांचे निधन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान सदस्या स्नेहा सुकांत सावंत यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

स्नेहा सावंत या शिरगाव जिल्हा परिषद गटातून निवडून आल्या होत्या. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढाईत त्यांनी संघर्षपूर्ण विजय मिळवला होता. त्यामुळे पहिल्या सव्वा वर्षासाठी त्यांच्या गळ्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ घालण्यात आली होती. त्यांची ही अध्यक्षपदाची कारकीर्द यशस्वी ठरली होती. सध्या त्या जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीवर सदस्य होत्या.

मागील दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. शनिवारी रात्री त्यांना वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर शनिवारी रात्रीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Former Zilla Parishad president Sneha Sawant passes away