शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
3
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
4
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
5
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
6
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
7
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
8
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
9
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
10
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
11
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
12
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
13
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
14
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
15
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
16
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
17
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
18
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
19
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
20
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत झाले फ्लेमिंगोचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 15:51 IST

रत्नागिरी : दक्षिण कोकणात कधीही न दिसणारा फ्लेमिंगो पक्षाचे रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथे दर्शन झाले. या पक्षाचे स्वस्तिक गावडे ...

रत्नागिरी : दक्षिण कोकणात कधीही न दिसणारा फ्लेमिंगो पक्षाचे रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथे दर्शन झाले. या पक्षाचे स्वस्तिक गावडे या हौशी छायाचित्रकाराने छायाचित्र काढले आणि कधीही न दिसणाऱ्या फ्लेमिंगोबाबत कुतूहल निर्माण झाले.फ्लेमिंगो या पक्षाला मराठीत ‘रोहित पक्षी’ असे म्हणतात. हा एक पाणपक्षी असून, लांब गळा, काठीसारखे पाय आणि लालसर रंगाचा पंख अशी या पक्षाची वैशिष्ट्य आहेत.  या पक्षाच्या लेसर फ्लेमिंगो, चिलीयन फ्लेमिंगो, ग्रेटर फ्लेमिंगो, ॲडियन फ्लेमिंगो, जेम्स किंवा पुना फ्लेमिंगो आणि अमेरिकन किंवा कॅरिबियन फ्लेमिंगो अशा सहा जाती आहेत. हे पक्षी भारतामध्ये उजनी जलाशय (पुणे) किंवा जायकवाडी  (औरंगाबाद) येथे हा पक्षी मोठ्याप्रमाणात आढळतात.हे पक्षी पाणथळीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसतात. दक्षिण कोकणात हा पक्षी दिसल्याच्या फारशा नोंदी नाहीत. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील परिसरात या पक्षाचे दर्शन झाले. प्रथमच हा पक्षी या भागात दिसल्याने पक्षीप्रेमींसाठी आणखी एक पर्वणी ठरली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीbirds sanctuaryपक्षी अभयारण्य