शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडाशिक्षकाचं क्षेत्रही महिलांकडून पादाक्रांत

By admin | Updated: October 18, 2015 00:21 IST

संध्या सावंत : अपेक्षा आॅलिंपिकची मात्र सुविधांचा अभाव

मेहरुन नाकाडे, रत्नागिरी : खेळात महिला पुढे असल्या तरी खेळ शिकवण्यासाठी शाळेत क्रीडा शिक्षिका असल्याचे खूप अभावानेच आढळतं. मुळात हे काम आपल्याला जमेल की नाही, हा मानसिक संघर्षच मोठा असतो. खेळ शिकवण्याचं कामही महिला लीलया पेलू शकते, ही बाब इतरांना पचवायलाही थोडी अवघडच. पण मूळच्या संध्या सावंत आणि आताच्या प्रणाली शितोळे यांनी क्रीडाशिक्षिक म्हणून सातत्यपूर्ण कामाचा ठसा उमटवला आहे. वडील तलाठी असल्यामुळे सातत्याने होणारी बदली व त्यामुळे विविध गावांतून राहण्याचा योग आला. शाळेत असल्यापासूनच खेळाची आवड होती. विविध स्पर्धांतून सहभागी होण्याची संधी मिळाली. देवरूख येथे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बीपीएडच्या पदवी अभ्यासक्रमासाठी वडाळा (मुंबई) येथे प्रवेश घेतला. त्यानंतर रत्नागिरीत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्याचदरम्यान सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये क्रीडा शिक्षिका म्हणून रूजू झाले., असे त्या सांगतात. संध्या सावंत या लंगडी, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, अ‍ॅथलेटिक्सच्या पंचपरीक्षा उत्तीर्ण आहेत. खेळाची आवड असली तरी क्रीडाशिक्षिकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. बहिणीच्या पाठिंब्यामुळेच क्रीडा शिक्षिका झाल्याचे त्या सांगतात. जिल्ह्यात दहा ते बाराच क्रीडाशिक्षिका कार्यरत आहेत. दिवसभर उन्हात राहून मुलांना खेळाचे प्रशिक्षण देणे, जिल्ह्यांतर्गत, विभागीय, राज्य स्पर्धांसाठी संघ घेऊन जाणे, मुलांइतकाच किंबहुना मुलांहून अधिक सरावात सहभाग दर्शवणे अशा गोष्टी साध्यासोप्या नसल्याने क्रीडा शिक्षिकांची संख्या कमी होती. पण संध्या सावंत यांनी त्या काळातही ही बाब सिद्ध करून दाखवली. शिक्षिकांची संख्या खूप मोठी असली तरी क्रीडाशिक्षिकांची संख्या मात्र अजून मर्यादीतच आहे. अर्थात त्याची सुरूवात करणाऱ्यांमध्ये संध्या सावंत यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल, हेही तितकेच खरे.