शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा आवेदनपत्रासाठी मुदतवाढ

By admin | Updated: November 5, 2015 23:58 IST

माध्यमिक शालांत : आॅनलाईन पद्धतीने स्वीकारणार

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेतर्फे मार्च २०१६मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे एकही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.नियमित बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी प्रमाणपत्र, प्राप्त झालेले पूर्वीचे खासगी विद्यार्थी व श्रेणी सुधार योजनेंतर्गत बसणारे विद्यार्थी व तुरळक विषय घेऊन बसणाऱ्या विद्यार्थ्यांना दि. १९ ते ३१ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाईन आवेदनपत्र सादर करण्याचे आवाहन केले होते. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता परीक्षा शुल्काअभावी कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, याकरिता २६ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.दुष्काळी भागातील विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नयेत, यासाठी परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे. याबाबतची सूचना सर्व विभागीय मंडळांना व अन्य क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.नियमित शुल्कासह माध्यमिक शाळांनी बँकेत चलनाद्वारे १९ नोव्हेंबरपर्यंत आवेदनपत्र आॅनलाईन जमा करावीत. विलंब शुल्कासह २६ नोव्हेंबरपर्यंत जमा करण्याचे आवाहन केले आहे. माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरण्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या नियमित शुल्कासह २३ नोव्हेंबर, तर विलंब शुल्कासह ३० नोव्हेंबरपर्यंत भरण्याचे आवाहन केले आहे. दि. १६ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत शाळांनी विद्यार्थ्यांच्या याद्यांची एक्सेलमध्ये प्रिंट काढावी, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)परीक्षेची आवेदनपत्र आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेकडे संपर्क साधावा. आॅनलाईन आवेदनपत्र भरताना येणाऱ्या अडचणींबाबत मुख्याध्यापकांनी संबंधीत विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.खासगी विद्यार्थी म्हणून पात्र होण्यासाठी नावनोंदणी फॉर्म नं. १७ ज्या विद्यार्थ्यांनी भरले आहेत, त्यांच्या परीक्षेची आवेदनपत्र भरण्याच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक उपलब्ध असतील, अशा विद्यार्थ्यांच्या आवेदनपत्रात आधार क्रमांक भरण्यात यावा. हा क्रमांक नसल्यास भरणे बंधनकारक नाही, असेही मंडळाने कळवले आहे.