शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

मातीच्या धरणाची गळती रोखण्यासाठी बेंटोनाइट ग्राउंटिंगचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 18:40 IST

Dam Khed Ratangiri-मातीच्या धरणांची गळती रोखण्यासाठी बेंटोनाइट ग्राउंटिंगचा प्रयोग पाटबंधारे विभागाने जिल्ह्यात सुरू केला आहे. तालुक्यातील कोंडिवली धरणाच्या गळती लागलेल्या भिंतीवर जिल्ह्यातील पहिला प्रयोग सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकोंडिवली धरणाच्या दुरूस्तीतून जिल्ह्यात पहिलाच प्रयोग तिवरे धरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रयत्न सुरू

खेड : मातीच्या धरणांची गळती रोखण्यासाठी बेंटोनाइट ग्राउंटिंगचा प्रयोग पाटबंधारे विभागाने जिल्ह्यात सुरू केला आहे. तालुक्यातील कोंडिवली धरणाच्या गळती लागलेल्या भिंतीवर जिल्ह्यातील पहिला प्रयोग सुरू करण्यात आला आहे.जुलै, २०१९ मध्ये चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील मातीचे धरण फुटण्याची दुर्दैवी घटना घडली होती. या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील कोंडिवली येथील धरणाला गेल्या तीन वर्षांपासून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती सुरू असते. धरण फुटीच्या छायेखाली ग्रामस्थांना वावरावे लागते. या धरणाच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी अनेकदा निवेदने दिली आहेत, तर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरण फुटीची शक्यता फेटाळून लावली होती. मात्र, धरणाच्या भिंतीची दुरुस्तीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. जिल्ह्यातील सर्वच मातीच्या धरणांची पाहणी करून शासनाला अहवाल देण्यात आला होता.सद्यस्थितीत कोंडिवली धरणासाठी बेंटोनाइट ग्राउंटिंग तंत्रज्ञान वापरून दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. यासाठी शासनाने ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. बेंटोनाइट या मातीच्या पावडरचा वापर या धरण दुरुस्तीसाठी करण्यात येणार आहे. यासाठी धरणाच्या भिंतीला वरील बाजूने १० ते २५ मीटर खोल छिद्र पाडून यामध्ये पाणी टाकून बेंटोनाइटचे जाडसर मिश्रण प्रेशरने सोडण्यात येते. धरणाच्या भिंतीत अंतर्गत असलेली छिद्रे या मिश्रणाने भरली जाऊन पाण्याची गळती रोखण्यात मदत होते. या पद्धतीने सुमारे ७० टक्के पाण्याची गळती रोखली जाईल, असा अंदाज ठेकेदार कंपनीचे राहुल पाटील यांनी व्यक्त केला. या तंत्रज्ञानाने मातीच्या धरणांची काही प्रमाणात गळती रोखली जाईल, तर भीतीच्या छायेखाली वावरणाऱ्या ग्रामस्थांनाही यातून थोडासा दिलासा मिळेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

बेंटोनाइट ग्राउंटिंगमुळे मातीच्या भिंती असलेल्या धरणांची पाणी गळती रोखण्यासाठी कोंडिवली येथे काम सुरू करण्यात आले आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे छिद्र असलेल्या धरणाची भिंत भक्कम होईल, सुरक्षित होईल, तसेच पाण्याची गळती रोखण्यास निश्चितच मदत होईल.- गोविंद श्रीमंगले,पाटबंधारे उपअभियंता, खेड

टॅग्स :DamधरणRatnagiriरत्नागिरी