इफेड्रीन : किशोर राठोडच्या शोधासाठी ठाणे पोलीस गुजरातला

By Admin | Updated: June 26, 2016 21:39 IST2016-06-26T21:39:01+5:302016-06-26T21:39:29+5:30

एव्हॉन लाइफसायन्सेसचा माजी संचालक मनोज जैनसह अटक केल्यानंतर ठाणे पोलिसांनी आपला मोर्चा आता शिपिंग कंपनीचा संचालक सुशील सुब्रमण्यम आणि किशोर राठोड यांच्याकडे वळवला आहे.

Ephedrine: Thane police for the search of Kishore Rathod, Gujarat | इफेड्रीन : किशोर राठोडच्या शोधासाठी ठाणे पोलीस गुजरातला

इफेड्रीन : किशोर राठोडच्या शोधासाठी ठाणे पोलीस गुजरातला

style="text-align: justify;">जितेंद्र कालेकर
ठाणे, दि. २६ -  सुमारे अडीच हजार कोटींच्या बेकायदेशीर इफेड्रीन साठय़ाप्रकरणी एव्हॉन लाइफसायन्सेसचा माजी संचालक मनोज जैनसह अटक केल्यानंतर ठाणे पोलिसांनी आपला मोर्चा आता शिपिंग कंपनीचा संचालक सुशील सुब्रमण्यम आणि किशोर राठोड यांच्याकडे वळवला आहे. गेल्या तीन दिवसांपासून ठाणे पोलिसांच्या एका पथकाने गुजरातमध्ये तळ ठोकला असून किशोरच्या नातेवाइकांसह अनेक जणांकडे त्यांनी त्याच्या ठावठिकाणांची चौकशी सुरू केली आहे.
 
आंतरराष्ट्रीय ड्रगमाफिया विकी गोस्वामी, ममता कुलकर्णी, किशोर राठोड, सुशीलकुमार, डॉ. अब्दुल्ला आणि त्याचे दोन साथीदार अशा सात फरारी आरोपींचा ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने शोध सुरू केला आहे. सोलापूरच्या कंपनीतील इफेड्रीनचा साठा केनियात पाठवण्याचे जानेवारी २०१६  मध्ये ठरल्यानंतर जयमुखी, पुनीत आणि किशोर राठोड यांच्यामार्फत विकीला सुमारे 14 किलो माल पाठवण्यात आला. याच दरम्यान 18 किलो इफेड्रीन ट्रान्सपोर्ट कंपनीचा संचालक सुशील सुब्रमण्यम आणि हरदीप गिल यांच्याकडे देण्यात आले. ही माहिती पुनीतकडून मिळाल्यानंतर त्याला दुजोरा देणारे आणखी काही जण गुजरातमध्ये ठाणो पोलिसांना मिळाले. त्यानंतर, 14 एप्रिल रोजीही अहमदाबादमध्ये किशोर राठोड आणि नरेंद्र काचा यांच्याकडून गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने हस्तगत केलेल्या मालासंदर्भातही ठाणे पोलिसांचे पथक आता चौकशी करीत आहे. 
नरेंद्रलाही 8 मे रोजी अहमदाबाद न्यायालयातून ठाणो पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडूनही अनेक महत्त्वाच्या बाबी उघड झाल्या आहेत. आता किशोर आणि नरेंद्रच्या अनेक नातेवाईक तसेच मित्र परिवाराकडून माहिती घेतली जात आहे. यातील किशोरच्या वडिलांसह काही नातेवाइकांना ठाण्यात चौकशीसाठी यावे लागणार असल्याचे एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले. किशोरचा माग काढण्यासाठी उपनिरीक्षक अमोल वालझाडे, धर्मराज भांगर, दिलीप सोनोने, हवालदार तुळशीराम तोपले आदींच्या पथकाने अहमदाबादच्या अनेक भागांतून त्याची चौकशी केली. त्याबरोबर गुजरातमध्ये आणखी कोणत्या ठिकाणी इफेड्रीन पाठवण्यात आले आहे का? त्याचे साठे केले आहेत का? याचीही चाचपणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Ephedrine: Thane police for the search of Kishore Rathod, Gujarat