शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

यंदा दिवाळीत मिठाईला महागाईची झळ, दुग्धजन्य मिठाईच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 17:09 IST

दिवाळीतील विशेष फराळासोबतच घरी येणाऱ्या पाहुण्यांचे गोड स्वागत करण्यासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या मिठाईला महागाईची झळ बसली आहे. दुधाच्या दरांत लिटरमागे दोन रूपयांनी झालेल्या वाढीमुळे दुग्धजन्य मिठाईच्या दरात किलोमागे ४० ते १०० रूपयांनी वाढ झाली आहे. दिवाळीमध्ये भेट देण्यात येणाऱ्या सुक्या मेव्याच्या दरांतही वाढ झाली आहे.

ठळक मुद्देयंदा दिवाळीत मिठाईला महागाईची झळ किलोमागे ४० ते १०० रुपयांनी वाढ, सुका मेवाही महागला

रत्नागिरी : दिवाळीतील विशेष फराळासोबतच घरी येणाऱ्या पाहुण्यांचे गोड स्वागत करण्यासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या मिठाईला महागाईची झळ बसली आहे. दुधाच्या दरांत लिटरमागे दोन रूपयांनी झालेल्या वाढीमुळे दुग्धजन्य मिठाईच्या दरात किलोमागे ४० ते १०० रूपयांनी वाढ झाली आहे. दिवाळीमध्ये भेट देण्यात येणाऱ्या सुक्या मेव्याच्या दरांतही वाढ झाली आहे.गतवर्षी मिठाईवर ५ टक्के जीएसटी लागू करण्यात आल्याने मिठाईच्या किमतीत वाढ झाली होती. यावर्षी दुधाच्या वाढलेल्या दरामुळे मिठाईच्या किमती वाढल्या आहेत. दुधापासून तयार होणारी मावा बर्फी, रबडी, बासुंदी, श्रीखंड, बंगाली मिठाई, काजुकतली, बदाम बर्फी यांच्या दरात वाढ होणार आहे.

बंगाली मिठाईचा एक नग सध्या ३० रूपये दराने विकण्यात येत आहे. मात्र लवकरच ३५ रुपयाने विक्री होणार आहे. केशरी श्रीखंड २८० रुपये किलो दराने विकण्यात येत होते, आता हेच श्रीखंड ३०० रुपये दराने विकण्यात येणार आहे.दिवाळीच्या सणात सुका मेवा भेट देण्यात येतो. विविध कंपन्यांकडून ड्रायफ्रूट बॉक्ससाठी विशेष मागणी असते. सुकामेवा बहुधा परदेशातून आयात होत असतो. यावर्षी परदेशातून अंजीर आणि पिस्त्याची आयात घटली आहे.अंजीर ६०० रुपयांनी महागलेअंजीरच्या दरात प्रति किलो ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे एक किलो अंजीरची विक्री १६०० ते १८०० रुपये किलो दराने होत आहे. तसेच पिस्ता ४०० रूपयांनी महागला असून १४०० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.अन्य मेव्यांचे दर स्थिरअन्य सुक्या मेव्याचे दर स्थिर आहेत. काजू १२०० रूपये किलो, बदाम ७०० ते १५०० रूपये, नमकीन पिस्ता ८०० ते १००० रूपये किलो, खारीक २०० ते २५० रूपये किलो, मनुके १५० ते ३०० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे.

टॅग्स :DiwaliदिवाळीRatnagiriरत्नागिरी