चिपळूण शहर काँग्रेसतर्फे डाॅक्टरांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST2021-07-03T04:20:23+5:302021-07-03T04:20:23+5:30

अडरे : चिपळूण शहर काँग्रेसतर्फे धवल सभागृहात ‘डॉक्टर्स डे’निमित्त डॉक्टरांचा गौरव करण्यात आला. यावेळी चिपळूण काँग्रेस शहराध्यक्ष लियाकत ...

Doctors honored by Chiplun City Congress | चिपळूण शहर काँग्रेसतर्फे डाॅक्टरांचा सन्मान

चिपळूण शहर काँग्रेसतर्फे डाॅक्टरांचा सन्मान

अडरे : चिपळूण शहर काँग्रेसतर्फे धवल सभागृहात ‘डॉक्टर्स डे’निमित्त डॉक्टरांचा गौरव करण्यात आला. यावेळी चिपळूण काँग्रेस शहराध्यक्ष लियाकत शाह, युवती काँग्रेसच्या प्रदेश महासचिव सोनललक्ष्मी घाग, इब्राहिम दलवाई यांनी डॉक्टरांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.

यावेळी डॉ. विजय रिळकर, डॉ. दीपक विखारे, डॉ. फैसल दलवाई, डॉ. मन्सूर परकार, डॉ. अभिजीत शिंदे, डाॅक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. सरफराज गोटे, डॉ. इलियास अत्तार, डॉ. फैसल दलवाई, डॉ. अखलाक खतीब, डॉ. झुल्फिकार मुल्ला आदी डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.

माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह, युवती काँग्रेसच्या प्रदेश महासचिव सोनललक्ष्मी घाग, इब्राहिम दलवाई, नगरसेवक करामत मिठागरी, नगरसेवक कबीर काद्री, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, काँग्रेस जिल्हा सेल अध्यक्ष, महिला शहर अध्यक्ष आर्या कदम, श्रद्धा कदम, मीरा नारकर, यश पिसे, नियाज सनगे उपस्थित होते.

--------------------------------

‘डाॅक्टर्स डे’च्या निमित्ताने चिपळूण शहर काॅंग्रेसतर्फे डाॅक्टरांचा गाैरव करण्यात आला. यावेळी चिपळूण शहर काॅंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित हाेते.

Web Title: Doctors honored by Chiplun City Congress