कुंबळे ग्रामपंचायतीकडून हळद रोपांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:21 IST2021-07-11T04:21:41+5:302021-07-11T04:21:41+5:30

मंडणगड : तालुक्यातील कुंबळे ग्रामपंचायतीतर्फे गावातील बचत गटांना हळद रोपांचे वाटप करण्यात आले. गावातील बचत गटांना अर्थार्जन निर्माण करून ...

Distribution of turmeric saplings from Kumble Gram Panchayat | कुंबळे ग्रामपंचायतीकडून हळद रोपांचे वाटप

कुंबळे ग्रामपंचायतीकडून हळद रोपांचे वाटप

मंडणगड : तालुक्यातील कुंबळे ग्रामपंचायतीतर्फे गावातील बचत गटांना हळद रोपांचे वाटप करण्यात आले. गावातील बचत गटांना अर्थार्जन निर्माण करून देण्याकरिता ग्रामपंचायतीने गावातील २२ बचत गटांना सुमारे ५०० हळद रोपांचे वाटप केले.

या कार्यक्रमाला नायब तहसीलदार भिसे, कुंबळेचे तलाठी कदम, सरपंच किशाेर दळवी, ग्रामसेवक बुध व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी सरपंच दळवी म्हणाले की, गावातील बचतगट चांगल्याप्रकारे काम करत असून, त्यांच्या कामामुळे संपूर्ण तालुक्यात गावचे नाव उंचावले आहे. अशावेळी ग्रामपंचायतीचीही जबाबदारी बचत गटांबाबत वाढते आहे. याच अनुषंगाने बचत गट आर्थिक सक्षम व्हावे, याकरिता ‘इकाॅनाॅमिक क्राॅप’ म्हणून ओळखले जाणारे हळद पिकाचे रोप ग्रामपंचायतीने बचत गटांना देऊन हातभार लावला आहे, असे सांगितले.

------------------------------

मंडणगड तालुक्यातील कुंबळे ग्रामपंचायतीतर्फे बचत गटातील महिलांना हळद राेपांचे वाटप करण्यात आले.

Web Title: Distribution of turmeric saplings from Kumble Gram Panchayat