शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीपुळेत पर्यटन दिनानिमित्त दिंडी

By admin | Updated: September 30, 2015 00:09 IST

पर्यटकांची लक्षणीय उपस्थिती : दिंडीत उंट व घोडे ठरले खास आकर्षण

गणपतीपुळे : गणपतीपुळे येथे महाराष्ट्र पर्यटन निवास, ग्रामपंचायत आणि अनेक पर्यटन संस्था व संस्थान श्रीदेव गणपतीपुळे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन दिंडी काढण्यात आली.रविवारी सकाळी ९.३० ते ११ या वेळेत गणपतीपुळे पर्यटन निवास महामंडळाच्या आवारातून पर्यटन दिंडीचा वाजतगाजत शुभारंभ करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर ही दिंडी मोरया चौकातून आपटा तिठ्याकडे व आपटा तिठा येथून प्राचीन कोकण म्युझियम येथे नेण्यात आली. यावेळी प्राचीन कोकणचे व्यवस्थापक वैभव सरदेसाई यांनी गुलाबपुष्प देऊन उपस्थितांचे स्वागत केले. तसेच उपस्थितांना सरबत पेयाचे वाटप केले. यावेळी सरदेसाई यांनी पर्यटनाबाबत महत्त्व पटवून दिले. त्यानंतर पुन्हा दिंडी एसटी स्टँडपासून कोल्हटकर तिठा व पुन्हा पर्यटन महामंडळाच्या आवारात या दिंडीचे जाहीर कार्यक्रमात रुपांतर झाले.या कार्यक्रमात आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचे व पर्यटकांचे पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापक नीलेश पित्रे यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. पर्यटनात पर्यटकांची मने जिंकण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यावसायिकाने करावा, असे सांगितले. त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश ठावरे यांनी पुढील वर्षी हा कार्यक्रम एका दिवसाचा साजरा होण्यासाठी पर्यटन दिनाच्या दोन दिवस आधी जाखडी, कोकणी खेळे व इतर लोककलांचे कार्यक्रम पर्यटन निवासाच्या आवारात ठेवल्यास या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना याचा लाभ घेतील व कोकणतील सांस्कृतिक कला लोकांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.एक अब्ज पर्यटक - एक अब्ज संधी अशा घोषवाक्याने यंदाचा पर्यटन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला गणपतीपुळेचे सरपंच महेश ठावरे, उपसरपंच देवीदास गुरव, गणपतीपुळे पर्यटन निवास महामंडळाचे व्यवस्थापक नीलेश पिसे, गणपतीपुळे पर्यटन व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद केळकर, एमटीडीसीचे निवृत्त व्यवस्थापक दत्तात्रय कुलकर्णी, प्राचीन कोकण म्युझिअमचे वैभव सरदेसाई, लंबोदर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष उमेश भणसारी, ग्रामपंचायत सदस्य स्मिता माने, संध्या देवरूखकर, प्रसाद कुलकर्णी, अमित घनवटकर, विजय केदार, बाबाराम कदम उपस्थित होते. (वार्ताहर)