शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

सुशोभिकरणाचा उडाला बोजवारा

By admin | Updated: July 13, 2015 00:36 IST

नगरसेवक गप्प : वेळेत काम न केल्याने निधी परत

चिपळूण : शहरातील नगर परिषद कार्यालयासमोरील जागेत सुशोभिकरणाचे काम पर्यटन विकास योजनेअंतर्गत हाती घेण्यात आले होते. मात्र, हे काम ठेकेदाराने मुदतीत न केल्याने या कामाचा निधी अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यात आला आहे. याबाबत सत्ताधारी व विरोधी नगरसेवकही मूग गिळून गप्प असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पर्यटन विकास योजनेअंतर्गत नगर परिषदेच्या समोरील प्रवेशद्वाराजवळ सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. गेल्या दीड ते दोन वर्षांपूर्वी कामाला प्रारंभ झाला. प्रत्यक्षात हे काम धिम्यागतीने करण्यात आले. पर्यटन विकासकामाचा निधी योग्य वेळी वापरण्यात न आल्याने हा निधी परत पाठवण्याची सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नगर प्रशासनाला करण्यात आली. ठेकेदाराने केवळ मातीचा भराव टाकून हे काम अपूर्ण ठेवले आहे. मुदतीत काम न झाल्याने या कामाचा निधी अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. नगर परिषद कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा असून, या भागातच सुशोभिकरणाचे काम एका ठेकेदारास देण्यात आले होते. मुदतीत काम न झाल्याने केवळ या परिसरात मातीचा भराव टाकण्यात आला आहे. नगर परिषद कार्यालयासमोर असणाऱ्या या कामाकडे सत्ताधारी व विरोधकही दुर्लक्ष करीत असून सर्वसामान्य जनतेकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नगर परिषद कार्यालयासमोरील काम रखडले असल्याने अन्य कामाच्या दर्जाबाबतही नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरु आहे.(वार्ताहर)चिपळूण नगर परिषद कार्यालयासमोरच हे काम असून, त्याबाबतही सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक जागरूक नसल्याने वास्तव पुढे आले आहे. जनतेच्या प्रश्नांचा कळवळा राहो. पण, ज्या छत्रपतींच्या नावावर पाच वर्षांपासून प्रचार केला जातो, त्यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या सुशोभिकरणाच्या कामाकडे एकाही नगरसेवकाचे लक्ष नसावे, यापेक्षा दुर्दैवी बाब ती कोणती? असा सवाल एका नागरिकाने लोकमतशी बोलताना व्यक्त केला.