शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदाराला ३१ जानेवारीची डेडलाईन

By admin | Updated: October 16, 2015 22:44 IST

चिपळूण शहर : मटण - मच्छी मार्केटचे काम धिम्या गतीने

चिपळूण : नगर परिषदेतर्फे शहरातील बाजारपेठेत मटण - मच्छीमार्केट बांधण्याचे काम सुरु आहे. मात्र, हे काम धिम्या गतीने सुरु असल्याने आता संबंधित विभागाने याची दखल घेतली असून, ठेकेदारास ३१ जानेवारी २०१६पर्यंत हे काम पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली आहे.शहरातील मच्छी व मटण विक्रेत्यांना एकत्रित व्यवसाय करणे सोयीचे व्हावे, या दृष्टीने बाजारपेठेत मटण - मच्छीमार्केट इमारतीचे भूमिपूजन काही वर्षांपूर्वी करण्यात आले. सध्या या भागात व्यवसाय करणारे मटण विक्रेते विविध ठिकाणी व्यवसाय करत आहेत. परंतु, मटण व मच्छी व्यवसाय एकत्रित नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. नगर परिषद प्रशासनातर्फे मटण व मच्छीमार्केट इमारतीचे काम हाती घेण्यात आले. मात्र, या कामास विलंब झाला असल्याने या कामाकडे बांधकाम सभापती बरकत वांगडे व नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांनी लक्ष घातले आहे.नगरपरिषदेने हाती घेतलेले मटण - मच्छी मार्केटचे काम तातडीने पूर्ण करून मच्छी आणि मटण व्यावसायिकांची होणारी गैरसोय दूर व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या मार्केटचे काम होण्यास दिरंगाई होत असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.मुदतीत काम पूर्ण व्हावे, अशी शहरवासीयांची अपेक्षा होती. परंतु, हे काम संथ गतीने सुरु असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदाराला ३१ जानेवारीपर्यंत मटण - मच्छी मार्केटचे काम पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली आहे. संबंधित ठेकेदार मुदतीत हे काम करेल अथवा कसे याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)