शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: बाबा फोन उचलत नाहीत, काका घरी जाऊन बघा; मुलीच्या काळजीमुळे उघडकीस आला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 16:40 IST

तीनही मुलींची लग्न, घरात राहत होते एकटेच

लांजा : ‘बाबा, गेली चार ते पाच दिवस फोन उचलत नाही आहेत. काका घरी जाऊन बघा,’ असे मुलीने फाेनवरून काकांना सांगितले. चुलत काका रात्री बॅटरी घेऊन घरामध्ये बघायला गेला असता मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत हाेती. त्यांनी बॅटरीच्या उजेडात पाहताच रक्ताच्या थाराेळ्यात भाऊ पडलेला पाहून भावाला धक्काच बसला. हा प्रकार तालुक्यातील कुर्णे येथे घडला असून, सुरेश तथा भरत रामचंद्र पड्ये (वय ४५), असे मृतावस्थेत सापडलेल्या प्राैढाचे नाव आहे.मुंबई येथे असलेल्या दोन नंबरच्या मुलीचा त्यांना कायम फोन असायचाच; पण गेले पाच दिवस वडील फोन उचलत नसल्याने तिच्या जीवाची घालमेल झाली. काळजीपाेटी तिने सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान चुलत काका श्याम पड्ये यांना फोन करून सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर ते रात्री ९:४५ वाजता घरी गेले असता घराजवळ माेठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. दरवाजा ढकलून पाहिले असता भाऊ घरात पडलेला हाेता. आजूबाजूला रक्ताचा सडा पाहून भावाला धक्काच बसला. स्वतःला सावरत त्यांनी वाडीतील ग्रामस्थांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह तसेच अनेक ठिकाणी रक्ताचे डाग असल्याने पोलिस पाटील सुनील पड्ये यांना घटनेची माहिती दिली. पोलिस पाटील सुनील पड्ये यांनी लांजा पोलिसांना माहिती दिली. रात्र असल्याने घटनास्थळी पोलिसांना ठेवण्यात आले. मंगळवारी सकाळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलिस उपअधीक्षक राधिका फडके, राजापूरचे पोलिस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक अमोद सरगंले, उपनिरीक्षक देवकन्या मैंदाड, सहायक पोलिस उपनिरीक्षक सचिन भुजबळराव, हवालदार राजेंद्र कांबळे, जान्हवी मांजरे, नितेश राणे, चालक उमाजी बजागे, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. रत्नागिरी फाॅरेन्सिक लॅब मोबाइल व्हॅन, श्वानपथक यांना पाचारण करण्यात आले. लांजा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह ग्रामस्थांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अमोद सरगंले करीत आहेत.

हाताची नस तुटलेलीसुरेश रामचंद्र पड्ये यांच्या डाव्या हातावर वर्मी घाव असल्याने त्यांची हाताची नस तुटलेली हाेती. त्याठिकाणाहून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे; परंतु त्यांनी स्वतःहून हातावर घाव घातला की, कुणी त्यांच्या हातावर घाव घातला. याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. हा घातपात आहे की, आत्महत्या याचा शाेध पाेलिस घेत आहेत.

तीनही मुलींची लग्न, घरात एकटेचसुरेश पड्ये यांच्या तीनही मुलींची लग्न झाल्याने ते घरात एकटेच राहत होते. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. आजूबाजूला घरेही नाहीत. त्यातच त्याला दारूचे व्यसन असल्याने तो कधी घरी यायचा, कधी कामावर जायचा याचा कुणालाच थांगपत्ता नसायचा. कामावरून घरी आल्यावर जेवण करून एकटाच घरी झोपायचा.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Daughter's Concern Unveils Father's Death; Phone Call Leads to Discovery

Web Summary : A daughter's worry about her father not answering his phone led to the discovery of his body in Ratnagiri. His cousin found him in a pool of blood after the daughter asked him to check on him. Police are investigating the cause of death.