शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हाणामारीचा कट नियोजितच : सावंत

By admin | Updated: May 26, 2015 00:52 IST

या हाणामारीचा कट आमदार भास्कर जाधव समर्थक गटाकडूनच नियोजित

अडरे : चिपळूण तालुक्यातील तुरंबव गावी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीचा कट आमदार भास्कर जाधव समर्थक गटाकडूनच नियोजित केला गेला होता, असा आरोप चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी आज (सोमवारी) बोलताना केला. काँग्रेस पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. यावेळी माजी सरपंच श्रीकांत पवार, महादेव चव्हाण, वसंत झिमण, वैभव विरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सावंत म्हणाले की, हा हल्ला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर झाला आहे. सत्कार समारंभाच्या वेळी काँग्रेसचे राजा यादव व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी त्यांनाही मारहाण करण्यात आली. हा वाद जाधव कुटुंबाचा होता. यामध्ये जाधव कुटुंबाचे किती लोक जखमी झाले त्यांची नावे जाहीर करावी. हल्ला झाला तेव्हा तुम्ही कोठे होतात? असा सवालही त्यांनी केला. हल्ल्यात जखमी झालेल्या नातेवाईकांना हॉस्पिटलला नेण्यात आले. मात्र, ग्रामस्थांना का नाही नेले ? याबाबत त्यांची वैचारिक क्षमता नाही. हल्ला झाला तेव्हा आमदार जाधव हे काही अंतरावरच होते, असेही सावंत यांनी म्हटले आहे.या हल्ल्यासाठी चिपळूणची सर्व मंडळी तेथे गेली होती. या हल्ल्याचा काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला आहे. (वार्ताहर)तुरंबव हल्लाप्रकरणी खरे सूत्रधार आमदार भास्कर जाधवच : सावंत यांचा आरोप.हल्ल्याचा काँग्रेसने केला निषेध.जाधव कुटुंबाचे किती लोक जखमी झाली, त्यांची नावे जाहीर करावीत : सावंत यांचे आव्हान.जखमी नातेवाईकांना रुग्णालयात नेले, मग ग्रामस्थांना का नेले नाही? सावंतांचा सवाल.