खापणे महाविद्यालयात औषधी वनस्पतींची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST2021-07-02T04:22:08+5:302021-07-02T04:22:08+5:30

राजापूर : तालुक्यातील रायपाटण - पाचल येथील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे औषधी वनस्पतींची लागवड ...

Cultivation of medicinal plants in the eating college | खापणे महाविद्यालयात औषधी वनस्पतींची लागवड

खापणे महाविद्यालयात औषधी वनस्पतींची लागवड

राजापूर : तालुक्यातील रायपाटण - पाचल येथील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली.

आजही अनेक वनस्पती आपल्या भोवताली आहेत की ज्यांची औषधी वनस्पती म्हणून ओळख आहे पण त्यांचे मूल्य आपली मुले जाणत नाहीत. या औषधी वनस्पतींची ओळख व्हावी, मानवी जीवनातील त्यांचे मूल्य समजावे या हेतूने महाविद्यालय परिसरात प्रतिवर्षी औषधी वनस्पतींची लागवड केली जाते. यावर्षीही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम यांच्या हस्ते अनेक दुर्मीळ औषधी वनस्पतींची लागवड महाविद्यालय परिसरात करण्यात आली. त्यामध्ये बेल, वेखंड, मल्टिव्हिटॅमिन, इन्सुलिन, अडुळसा, बिबवा, ओवा, काळीमिरी, चंदन, रक्तचंदन, गौलकाहारी अशी अनेक दुर्मीळ रोपे प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम यांनी उपलब्ध करून दिली होती. त्यांची लागवड महाविद्यालय परिसरात करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास पाटील, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, मुख्य लिपीक नरेश पाचलकर व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

-------------------------

राजापूर तालुक्यातील पाचल येथील खापणे महाविद्यालयात प्राचार्य डाॅ. पी. एस. मेश्राम यांच्या हस्ते औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली.

Web Title: Cultivation of medicinal plants in the eating college