शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात ७ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:24 IST

चिपळूण : अनेकवेळा समज देऊनही दुकाने उघडी ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर चिपळूण पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे. सोमवारी दिवसभरात पोलिसांनी ...

चिपळूण : अनेकवेळा समज देऊनही दुकाने उघडी ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर चिपळूण पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे. सोमवारी दिवसभरात पोलिसांनी ७ व्यापाऱ्यांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले. त्यामध्ये चिपळूण शहर आणि ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांचा समावेश आहे तसेच वाहनांवरदेखील धडक कारवाई केली जात आहे.

लॉकडाऊन काळात ‘अत्यावश्यक सेवे’तील दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत मुभा देण्यात आली आहे. तर अन्य दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश आहेत तरीही सकाळी ११ नंतर काहीजण दुकानांचे शटर बंद करून मागील दाराने ग्राहकांना दुकानात घेऊन व्यापार करत असल्याचे निदर्शनास येत असल्याने पोलिसांनी थेट कारवाईचे सत्र सुरू करून अनेक व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. ग्रामीण भाग आणि बाजारपेठेत पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांची गस्त सुरू असताना काही दुकानांत विक्री सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी सदाकत शरिफ पेचकर (खाटीक आळी), प्रभुस्वामी सिद्धप्पा मठपती (कोलेखाजन), शांताराम दुधाजी घाणेकर(कुंभार्ली), विशाल रमेश जाणवळकर (खेंड), महेंद्रकुमार शोगाजी प्रजापती (भेंडीनाका), श्रीरंग गणपत माजेलकर (पानगल्ली), प्रमोद महादेव खातू (वाणीअळी) या ७ व्यापाऱ्यांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवें पोळ गस्त आणि कारवाई करत असताना दुसऱ्या बाजूला पोलिसांनी दुसरी टीम विनाकारण विना हेल्मेट फिरणाऱ्यावर तसेच विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवरही कारवाईचे सत्र सुरू ठेवण्यात आले आहे.