रत्नागिरी : गणपती उत्सवादरम्यान रत्नागिरीत कोरोना रूग्णांची संख्या भरमसाठ वाढली होती. मात्र, आरोग्य यंत्रणेच्या अथक प्रयत्नांमुळे ही संख्या घटली. दिवाळीपूर्वी ही संख्या ४ पर्यंत कमी आली होती. मात्र, आता दिवाळीनंतर रुग्ण संख्या वेगाने वाढू लागल्याने वाढीचा दर असाच राहिला तर नाईलाजाने लॉकडाऊनची वेळ येईल, असा अंदाज आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.गणेशोत्सव काळात रुग्णसंख्या भरमसाठ वाढली. मृत्युचा दरही वाढू लागला. मात्र, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णसंख्या आटोक्यात येऊ लागली. मृत्युचे प्रमाणही हळूहळू घटू लागले. त्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळू लागला. आरोग्य यंत्रणाही थोडीशी ह्यरिलॅक्सह्ण झाली.मात्र, कोरोना आता गेला, असे समजून दिवाळीच्या काळात लोकांची गर्दी वाढू लागली. मास्कशिवाय लोक खरेदीसाठी फिरू लागले. योग्य शारीरिक अंतराचा विसर पडल्याने पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. परिणामी रुग्णसंख्या वाढली तर लॉकडाऊन होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.कोरोनाचा विसरगणेशोत्सवाच्या काळात कोरोनाचा वाढलेला संसर्ग आता कमी झाला आहे. मृत्यूची संख्याही शुन्यावर आल्याने कोरोना गेलाच, असे लोकांना वाटू लागले आहे. त्यामुळे सर्वत्र आता लोकांमध्ये बेफिकीरी आली आहे. मात्र, आपल्याबरोबरच घरातील गंभीर आजार असलेल्या वृद्धांना कोरोनाचा धोका अधिक आहे. मृत्यूचे प्रमाण कमी झाले म्हणून आनंद मानून उपयोग नाही. अजूनही काही काळ खबरदारी घेणे गरजेचे आहे, तरच लॉकडाऊनची वेळ येणार नाही.आरोग्य यंत्रणा पुन्हा सज्जरूग्णांची संख्या दिवाळीनंतर वाढणार, हे लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झाली आहे. प्रत्येक तालुक्यात तपासणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरही कोरोना चाचण्या घेण्यात येत आहेत.अन्यथा पुन्हा लॉकडाऊनलॉकडाऊनच्या काळाचे परिणाम सर्वांनाच माहित आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन झाले तर ते आपल्याला परवडणारे नाही. सध्या रूग्णसंख्या आटोक्यात आहे. मात्र, ती पुन्हा वाढली तर नाईलाजाने लॉकडाऊनची वेळ येईल.लोकांना वाटते कोरोना गेला, पण कोरोना गेलेला नाही. अजूनही अंदाजे एक वर्ष कोरोना राहील, कदाचित त्याहीपेक्षा अधिक काळ राहील. सद्यस्थितीत आपण काहीच सांगू शकत नाहीत. रूग्ण वाढले तर लॉकडाऊन करावेच वाढेल. म्हणूनच लोकांनी काळजी घ्यायला हवी. मास्क वापरायलाच हवा, शारीरिक अंतर राखायलाच हवं.- डॉ. संघमित्रा फुले,जिल्हा शल्य चिकित्सक
Coronavirus Unlock : लॉकडाऊन टाळायचे असेल तर काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:23 IST
Coronavirus Unlock, Health, Ratnagirinews गणपती उत्सवादरम्यान रत्नागिरीत कोरोना रूग्णांची संख्या भरमसाठ वाढली होती. मात्र, आरोग्य यंत्रणेच्या अथक प्रयत्नांमुळे ही संख्या घटली. दिवाळीपूर्वी ही संख्या ४ पर्यंत कमी आली होती. मात्र, आता दिवाळीनंतर रुग्ण संख्या वेगाने वाढू लागल्याने वाढीचा दर असाच राहिला तर नाईलाजाने लॉकडाऊनची वेळ येईल, असा अंदाज आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Coronavirus Unlock : लॉकडाऊन टाळायचे असेल तर काळजी घ्या
ठळक मुद्देलॉकडाऊन टाळायचे असेल तर काळजी घ्याआरोग्य विभागाचा इशारा; कोरोना अजूनही आहे