कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST2021-07-03T04:20:30+5:302021-07-03T04:20:30+5:30

२. रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ गावात करण्यात आलेल्या ५६ जणांच्या कोरोना चाचणीत ३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. प्राथमिक ...

Corona patient | कोरोना रुग्ण

कोरोना रुग्ण

२. रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ गावात करण्यात आलेल्या ५६ जणांच्या कोरोना चाचणीत ३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र जाकादेवी यांच्यामार्फत कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत आगरनरळमधील तीन रुग्णांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र जाकादेवी यांच्याकडून देण्यात आली.

३. रत्नागिरी तालुक्यातील १८ ते २९ वर्षे वयोगटातील युवकांना लसीकरणासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पालिकेला ५० लाख रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. रत्नागिरी शहरातील युवकांच्या लसीकरणासाठी लवकरच ६ हजार डोस उपलब्ध होणार आहेत. पालिका क्षेत्राच्या १५ प्रभागांमधील पाच केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. यापूर्वी १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती.

Web Title: Corona patient