शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे कलाकारांना करावा लागतोय संकटांचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST

रत्नागिरी : कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले आहे. विविध यंत्रणांवर याचा परिणाम झाला आहे. ...

रत्नागिरी : कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले आहे. विविध यंत्रणांवर याचा परिणाम झाला आहे. रंगभूमी क्षेत्रालाही याचा फटका बसला असून रंगमंचावरच उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्या कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते यांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

लॉकडाऊनमध्ये टीव्ही आणि मोबाईल वगळता मनोरंजनाची सर्वच साधने बंद आहेत. चित्रपटगृहे, नाट्यगृहांना टाळे लावण्यात आले आहे. गतवर्षीही लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. यावर्षी कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असल्यामुळे लॉकडाऊन शासनाला जाहीर करावे लागले. सद्यस्थितीत लॉकडाऊन लवकर संपणे अशक्य आहे, शिवाय संपले तरी सोशल डिस्टन्सिंगमुळे नाट्यगृहे लवकर खुली होणे अशक्य आहे. अनेक कलाकार, लेखक, दिग्दर्शक केवळ नाटकांवर निर्भर आहेत. या सर्वांच्याच उपजीविकेला खीळ बसली आहे. काही कलाकारांनी आधीच्या बचतीवर गतवर्षी संकटावर काही प्रमाणात मात केली होती. मात्र गतवर्षी जानेवारीपासून कार्यक्रम सुरू झाले. जेमतेम दोन ते अडीच महिनेच कलाकारांना काम मिळाले. ज्या कलाकारांचा पूर्णवेळ नाटक किंवा कलेवर उदरनिर्वाह अवलंबून आहे, त्यांच्यापुढे खरा उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊननंतरही व्यवसाय रुळावर यायला बराच वेळ जाणार आहे. त्यामुळे हा पाच ते सहा महिन्यांचा काळ कसा काढायचा, असा प्रश्न कलाकारांपुढे पडला आहे.

लॉकडाऊनमधील महिनाभराचे प्रयोग, एकूण नाटके आणि निर्मिती संस्था यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वास्तविक हा हंगाम नाटकांचा आहे. पावसाळा सुरू झाल्यावर फारसे प्रयोग होत नाहीत. त्यामुळे निर्मात्यांपुढेही आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. नाटक बसविण्यासाठी केलेला खर्च उत्सव, जत्रेच्यानिमित्ताने नाटकांचे प्रयोग ठिकठिकाणी अल्प मोबदल्यात सादर करून संस्था भागवित असतात. मात्र लॉकडाऊनमुळे सर्व प्रयोग रद्द करण्यात आल्याने छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. सध्या काही संस्थांकडून ऑनलाईन कथा, कविता, नाट्यवाचन, एकपात्री स्पर्धा आयोजित केल्या जात असून त्यासाठी मात्र चांगला प्रतिसाद लाभत आहे.

.................................

व्यावसायिक नाटके पूर्णपणे बंद असल्याने पडद्यामागच्या कलाकारांना काम नसल्याने त्यांच्यावर उपासमार ओढवली आहे. गतवर्षीप्रमाणे आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कलेवर उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्यांवर उपासमार ओढवली आहे. लॉकडाऊन संपले तरी सोशल डिस्टन्सिंगमुळे नाट्यव्यवसाय सुरू होण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व कलाकारांना शासनाकडून मदत करण्यात यावी.

- समीर इंदुलकर,

कार्याध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषद, रत्नागिरी शाखा.