शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

गणेशभक्तांसाठी यंदा १४५० गाड्यांची सोय

By admin | Updated: August 10, 2015 00:37 IST

रत्नागिरी आगार : एस. टी. प्रशासन वाहतुकीसाठी सज्ज

रत्नागिरी : भक्तांना वेध लागलेल्या गणपती बाप्पांच्या आगमनाला अवघा महिना शिल्लक राहिला आहे. गणेशभक्तांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने गणेशोत्सव कालावधीत मुंबई मार्गावर १४५० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे गणेशोत्सवासाठी दरवर्षी जादा गाड्या सोडून प्रवाशांची सोय करण्यात येते. १२ ते २७ सप्टेंबर या कालावधीत एस. टी.च्या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. याशिवाय प्रवाशांच्या मागणीनुसार ग्रुप बुकिंग सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एखाद्या गावातील मंडळींनी ४४ सीटचे एकत्रित आरक्षण केल्यास त्यांना त्यांच्या गावासाठी खास बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रुप बुकिंगला १२ आॅगस्टपासून प्रारंभ होणार आहे. कोकण रेल्वेद्वारे येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असली तरी एस. टी.ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे. ऐन गणेशोत्सवात रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेले असताना एस. टी.ने मात्र सुरळीत, सुरक्षित प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे. मुंबई, पुणे, बोरिवली, ठाणे, भांडुप, कुर्ला नेहरूनगर, विठ्ठलवाडी, नालासोपारा, परळ, कल्याण आदी मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. गणेशोत्सवात रत्नागिरी विभागाने सन २०१३मध्ये १३१७ गाड्या सोडल्या होत्या. त्याद्वारे १ कोटी ८७ लाख ३८ हजार ८०० रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. सन २०१४मध्ये १४३० जादा गाड्या सोडल्या होत्या. त्यामुळे विभागाला दोन कोटी १० लाख ६९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते, तर यावर्षी १४५० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. गौरी गणपती विसर्जनानंतर मुंबईकरांच्या परतीसाठी २१ सप्टेंबरपासून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. याशिवाय नियमित १५० गाड्या दररोज मुंबई मार्गावर धावत आहेत.गणेशोत्सव कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता जादा गाड्यांसमवेत चेकपोस्ट गस्तीपथके तैनात करण्यात येणार आहेत. सकाळी १० ते १२.३० तसेच १२.३० ते ६ यावेळेत गस्तीपथके महामार्गावर कार्यरत राहून जादा गाड्यांची तपासणी करणार आहेत. कशेडी येथे चेकपोस्ट उभारण्यात येणार आहे. याशिवाय तात्पुरते वाहनतळ व दुरुस्ती पथकांची सुविधा महामार्गावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक आगारामध्ये चौकशी केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरी विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी दिली. (प्रतिनिधी)