शहरं
Join us  
Trending Stories
1
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
2
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
3
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
4
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
5
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
6
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
7
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
8
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
9
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
10
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
11
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
12
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
13
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
14
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
15
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
16
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
17
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
18
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
19
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
20
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
Daily Top 2Weekly Top 5

जडणघडणीत शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे

By admin | Updated: March 31, 2015 00:23 IST

विजयकुमार काळम : जिल्हा परिषद आदर्श शाळा पुरस्कार वितरण समारंभ

रत्नागिरी : शिक्षक हा समाजाचा जडणघडणीतील महत्त्वाचा घटक असून, त्यांच्या संस्कारातून आणि कल्पकतेतूनच चांगला विद्यार्थी आणि पर्यायाने चांगला समाज घडत असतो. शिक्षकांच्या या महान कार्याचा गौरव करणे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या कै. शामराव पेजे सभागृहात आयोजित आदर्श शाळा पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, उपाध्यक्ष सतीश शेवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरिष जगताप, शिक्षण समितीच्या सभापती ऐश्वर्या घोसाळकर, आरोग्य समितीचे सभापती डॉ. अनिल शिगवण, समाजकल्याण समितीच्या सभापती शीतल जाधव, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रज्ञा धनावडे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेंद्र अहिरे यांच्यासह पंचायत समित्यांचे सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
काळम म्हणाले की, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सत्कार्याची आणि कसं जगायचे, याची शिकवण द्यायला हवी. याचबरोबर समाजात जबाबदार नागरिक म्हणून वावरताना जागरूकपणे कसं राहायचे याचे ज्ञान विद्यार्थ्यांना द्यायला हवे. यातूनच आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक बनू शकतील, असे ते म्हणाले.
पुरस्कारार्थींचे कौतुक करताना जगदीश राजापकर यांनी जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. सर्वांच्या सहकार्यातूनच आपला जिल्हा शिक्षण क्षेत्रात अग्रेसर राहील.
यावेळी सतीश शेवडे, ऐश्वर्या घोसळकर, उदय बने यांची भाषणे झाली. यावेळी जिल्ह्यातील कनिष्ठ आणि वरिष्ठ गटातील आदर्श शाळांना आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनाही गौरविण्यात आले. पुरस्कारानंतर ग्रामस्थांनी मिरवणुका काढल्या. (शहर वार्ताहर)

आजच्या आदर्श शाळा पुरस्काराने ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत होता. ज्या शाळांना पुरस्कार जाहीर झाला होता, त्या त्या गावांतील ग्रामस्थ, पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थीही चार चाकी गाड्या घेऊन जिल्हा परिषदेत दाखल झाले होते. यावेळी त्यांनी ढोल-ताशे बरोबर आणले होते. सभागृहामध्ये पुरस्कार जाहीर होताच ग्रामस्थ एकच जल्लोश करत होते. तसेच ढोल-ताशांमुळे परिषद भवनाचा परिसर दणाणला. जिल्हा परिषद भवनाचा आवारही खचाखच भरले होते. शाळेच्या पुरस्काराचा अभिमान ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसत होता.


तालुकाकनिष्ठ शाळावरिष्ठ शाळा
मंडणगडबोरघरकेंद्रीय शाळा तिडे नं.१
दापोलीमुरुड हर्णै नं.१, देहेण
खेडआयनी कारभार लंबाडधामणदिवी नं.१
चिपळूणकळवंडे-माडवाडीकोळकेवाडी-बोलाड
गुहागरपाली देणवाडीचिखली नं.१
संगमेश्वरतुरळ-डिकेवाडीचाफवली नं.१, कुंडी
रत्नागिरीभोके-मठवाडीकरबुडे-मुळगाव
लांजाजावडे नं. ३शिरवली
राजापूरतळगाव क्र.२कोंढेतड क्र.२
एकूण९११