शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

केवळ स्वार्थासाठीच जप्ती

By admin | Updated: October 16, 2015 22:45 IST

गुहागर तालुका : मयुरेश कचरेकर यांचा सरपंचांवर आरोप

गुहागर : आरजीपीपीएलकडून करापोटी एक कोटी वीस लाख न आल्याने सरपंच यशवंत बाईत यांनी कंपनीवर जप्तीचा इशारा दिला होता. यामुळे कंपनीला टाळे लागून कामगारांवर उपासमारीची वेळ येणार हे माहीत असूनही केवळ स्वार्थासाठी ही जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप नगरसेवक मयुरेश कचरेकर यांनी केला आहे. आरजीपीपीएल हा गुहागर तालुक्यातील एकमेव मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे तालुक्यातील ८०० ते ९०० कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. या कंपनीचे बरेचसे क्षेत्र हे अंजनवेल ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याने सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात करापोटी एक कोटी वीस लाख रुपये ग्रामपंचायतीला देऊ न शकल्यामुळे त्याच्या वसुलीसाठी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच यशवंत बाईत यांनी कंपनीवर जप्ती आणण्याचा इशारा दिला होता. कंपनीला टाळे लागले तर तालुक्यातील सर्व कामगारांवर उपासमारीची वेळ येईल याचा साधा विचार न करता केवळ स्वत:च्या फायद्यासाठी कराच्या स्वरुपात मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांमधून आणखी लाखोंचा भ्रष्टाचार करायचा हाच त्यांचा निव्वळ उद्देश होता, असे ते म्हणाले.अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातून होणारी वीज निर्मिती मागील दोन वर्षापासून पूर्णपणे बंद असल्याने प्रकल्प प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे कंपनी कसे तरी रडत - खडत कामगारांचे पगार करत आहे. या कंपनीमुळेच तालुक्यातील शेकडो कामगारांच्या कुटुंबातील चुली पेटत आहेत. या आर्थिक संकटामुळे कंपनी अंजनवेल ग्रामपंचायतीचे कर देऊ शकली नाही. कंपनीची परिस्थिती माहिती असतानाही सरपंच यशवंत बाईत यांनी कंपनीला जप्तीचा इशारा दिला. या जप्तीने कंपनी बंद झाल्यास सर्व कामगारांवर उपासमारीची वेळ येईल याचा विचार त्यांनी केलेला नाही, असे ते म्हणाले. कर वसूल नाही झाला तर गावातील विकासकामे करु शकणार नाही असे कारण त्यांनी पुढे केले आहे. वास्तविक आजपर्यंत ग्रामपंचायतीला कोट्यवधींचा कर मिळाला असून, अंजनवेल ग्रामपंचायत अतिशय भक्कम आर्थिक स्थितीत आहे. काही वर्षे कर नाही मिळाला तरीही ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्याप्रकारे चालू शकेल हे लेखा परीक्षणातील शिल्लक रकमेच्या आकडेवरुन दिसून येते, असे कचरेकर यांनी म्हटले आहे.परंतु, या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचांनी संगनमताने केलेल्या घोटाळ्यांतील सहभाग पाहता त्यांनी ९०० कुटुंबांच्या रोजीरोटीपेक्षा कंपनीकडून कराच्या रुपाने आलेले कोट्यवधी रुपये कोणत्याही परिस्थितीत वसूल करुन आर्थिक घोटाळे करायचे हे या ग्रामपंचायतीच्या एका मागोमाग एक बाहेर पडत असलेल्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणांवरुन स्पष्टपणे दिसून येत असल्याचा आरोपही कचरेकर यांनी यावेळी केला. (प्रतिनिधी)आरोपाच्या फैरी : ना खायेंगे ना खाने देंगेसरपंच यशवंत बाईत हे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. याआधी गावठाण जमिनीच्या प्रशासकीय गैरप्रकरणात व आता ग्रामसचिवालयाच्या बांधकाम प्रकरणात आर्थिक भ्रष्टाचारात सहभाग असल्याचे पुरावे समोर असताना त्यांच्यावर ‘ना खायेंगे ना खाने देंगे’ असे म्हणणारे पक्षाचे राज्य चिटणीस विनय नातू पक्षांतर्गत कारवाई करणार की, अजूनही दिशाभूल करणारी वक्तव्ये करुन भ्रष्टाचाऱ्यांना पाठबळ देणार? असा खडा सवाल त्यांनी केला आहे. कचरेकर यांच्या आरोपांमुळे गुहागर तालुका पुन्हा एकदा ढवळून निघाला आहे. यामुळे गुहागरातील राजकीय वातावरण तापले असून, या वादाची ठिणगी कोणता भडका उडवणार याकडेच गुहागरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.वस्तुस्थिती काय?सरपंच यशवंत बाईत यांच्यावर झालेल्या आरोपानंतर गुहागरातील राजकीय वातावरणात गरमागरम चर्चा सुरू आहे. यामध्ये नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याचा उलगडा यशवंत बाईत यांनी करावा, अशी मागणी होत आहे.