ओणी येथे काेविड रुग्णालयाच्या कामाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:32 IST2021-04-24T04:32:06+5:302021-04-24T04:32:06+5:30

राजापूर : राजापूर - लांजा - साखरपा मतदारसंघाच्या मध्यवर्ती असे ओणी (ता. राजापूर) ...

Commencement of work of Kavid Hospital at Oni | ओणी येथे काेविड रुग्णालयाच्या कामाला सुरूवात

ओणी येथे काेविड रुग्णालयाच्या कामाला सुरूवात

राजापूर : राजापूर - लांजा - साखरपा मतदारसंघाच्या मध्यवर्ती असे ओणी (ता. राजापूर) येथे आमदार राजन साळवी यांच्या स्थानिक विकास निधीतून सुमारे १ कोटी रुपये खर्च करून काेविड रुग्णालय उभारण्यात येत आहे. या रुग्णालयाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या कामाची आमदार राजन साळवी यांनी पाहणी केली.

तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असून, जवळपास २७०च्या घरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जाऊन पाेहाेचली आहे. मागील दोन दिवसांत तर शंभरहून अधिक रुग्ण सापडले आहेत. या तालुक्यासाठी रायपाटण येथील खापणे महाविद्यालयाच्या मागासवर्गीय वसतिगृहात गतवर्षी कोविड सेंटर सुरु करण्यात आले होते. आता तालुक्यासाठी ओणी येथे कोविड रुग्णालय सुरु केले जाणार आहे. आमदार राजन साळवी यांच्या स्थानिक विकास निधीतून सुमारे एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे रुग्णालय तातडीने सुरू हाेण्यासाठी आमदार राजन साळवी यांचे प्रयत्न सुरू आहेत. या कामाची त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी तहसीलदार प्रतिभा वराळे, राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. मेस्त्री, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता दुधारे, पंचायत समिती सदस्य प्रतीक मठकर व अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Commencement of work of Kavid Hospital at Oni