शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खारेपाटण येथे कडकडीत बंद

By admin | Updated: August 24, 2015 23:25 IST

मारहाण प्रकरण : व्यापारी असोसिएशन, रिक्षा संघटना व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

खारेपाटण : खारेपाटण ग्रामस्थ व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी प्रमोद कांबळे, त्यांचे सहकारी यांच्यात झालेल्या मारहाणप्रकरणी पोलिसांनी दडपशाहीने ग्रामस्थांची तक्रार न घेता कारवाई केली. अटक केलेल्या ग्रामस्थांवर चुकीची कलमे लावून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरविले. याच्या निषेधार्थ खारेपाटण व्यापारी असोसिएशनने सोमवारी पुकारलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद लाभला. खारेपाटणमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्यावतीने सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त बाजारपेठ, बसस्थानक परिसरात लावण्यात आला होता. खारेपाटण बंदच्या पार्श्वभूमीवर विष्णू मंदिर येथे एकत्र येऊन बैठक घेण्यात आली. यामध्ये कणकवली पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना संबंधित घटनेतील अटक झालेल्या ग्रामस्थांची तक्रार दाखल करून घेण्याबाबत निवेदन देण्याचे ठरविण्यात आले, तर जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी सिंधुदुर्ग यांना व्यापारी असोसिएशन खारेपाटण व ग्रामस्थांच्यावतीने भेट घेऊन निवेदन देण्याचे ठरले. बैठकीला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ एकत्र आले होते. या घटनेतील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी प्रमोद कांबळे यांचे काही दिवसांपूर्वी हातीवले येथील घटनेत रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले असतानाही त्यांच्याकडे दुसरे रिव्हॉल्व्हर आले कुठून याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रफिक नाईक यांनी केली, तर संबंधित अधिकारी आपल्या अधिकाराच्या जोरावर अवैधरीत्या जप्त केलेली दारू रत्नागिरी, लांजा विभागात कमी पैशात विकून धंदा करीत असल्याचा आरोपही यावेळी ग्रामस्थांच्या बैठकीत करण्यात आला. यामुळे मारहाण झालेल्या कर्मचारी प्रमोद कांबळे यांची सखोल चौकशी करण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. गावात यापुढे पोलिसांना कुठल्याही प्रकारचे सहकार्य ग्रामस्थ करणार नाहीत, तसेच महात्मा गांधी तंटामुक्त समितीचीदेखील निवड खारेपाटणात करण्यात येणार नसल्याचे ग्रामपंचायतीच्यावतीने सांगण्यात आले. (वार्ताहर)