शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नद्यांमधील गाळ उपसण्याचे आव्हान : पाटील

By admin | Updated: January 15, 2015 23:33 IST

फणसवणे येथे विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिराला प्रारंभ झाला

रत्नागिरी : नदी ही मानवी जीवनाच्या उगमाचा मूळ स्रोत आहे. आज या नद्यांचे स्रोत होरले आहेत. ते मुक्त करून पर्यावरणाशी जोडणे हे आजच्या युवा पिढीसमोर मोठे आव्हान आहे. हे तगडे आव्हान नवनिर्माणने स्वीकारले, ही अत्यंत उल्लेखनीय बाब असल्याचे गौरवोद्गार मुंबई विद्यापीठाच्या येथील उपकेंद्राचे समन्वयक डॉ. पांडुरंग पाटील यांनी काढले.येथील नवनिर्माण महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे येथे विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिराला प्रारंभ झाला. संगमेश्वर येथे आयोजित शिबिराचे उद्घाटक म्हणून मुंबई विद्यापीठाचे समन्वयक डॉ. पांडुरंग पाटील उपस्थित होते. यावेळी नवनिर्माण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, कार्यवाह मोहन खातू, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, जिल्हा समन्वयक डॉ. राहुल मराठे, शिवसेना जिल्हा नेते राजेंद्र महाडिक, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मधुकर नारकर, शंकर भिंगार्डे, विलास कोळपे, दिलीप रहाटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. अभिजीत हेगशेट्ये यांनी या शिबिराच्या कामाची संकल्पना स्पष्ट केली. तसेच संगमेश्वरची पूरपरिस्थिती कथन केली. विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून उभा राहणारा बंधारा एक गाव उभा करू शकतो, पुरापासून मुक्त करू शकतो, हा संदेश निश्चितपणे या युवा शक्तितून दिला जाणार आहे. या विद्यापीठस्तरीय शिबिरामध्ये मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे २०० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. शिबीराच्या पहिल्याच रात्री डॉ. भगवान नारकर यांचे प्राणायामवर व्याख्यान झाले. शिबिरार्थींच्या जेवणाच्या सामानाची जबाबदारी संगमेश्वर व्यापारी मंडळाने उचलली आहे. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मधुकर नारकर यांचे आभार मानण्यात आले. संगमेश्वर येथील श्रमदान कार्यात सरपंच विवेक शेरे, बाळू शेट्ये, यांचे सहकार्य लाभले. प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांनी शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)