शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

देवरुखात ३५० बेड्‌सचे काेविड सेंटर सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:32 IST

देवरुख : संगमेश्वर तालुका प्रशासकीय यंत्रणा कोविडचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. प्रशासकीय यंत्रणेला सर्वपक्षीयांसह विविध कंपन्या, ...

देवरुख : संगमेश्वर तालुका प्रशासकीय यंत्रणा कोविडचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. प्रशासकीय यंत्रणेला सर्वपक्षीयांसह विविध कंपन्या, सामाजिक संस्था, उद्योजक यांचा हातभार लागत आहे. तालुक्याची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, सद्यस्थितीला ३५० बेड्‌स असलेले कोविड सेंटर सज्ज ठेवण्यात आले आहे. भविष्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ५५० बेड्‌स उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सुहास थोरात यांनी दिली.

तसेच डेडिकेटेड कोविड सेंटर म्हणून मातृमंदिर येथील एसएमएस हॉस्पिटलमध्ये सुरू करण्याबाबतच्या हालचालीही सुरू करण्यात आल्या आहेत. त्यासाठी रविवारी तहसीलदार सुहास थोरात, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. एस. सोनावणे, देवरुख नगरपंचायतीचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे आणि मातृमंदिरचे एसएमएसचे अधिकारी उपस्थित होते.

यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहात ५२ बेड्सचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. मात्र, देवरुखसह तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे बेड्‌सची संख्या कमी पडू लागली आहे. ही अडचण लक्षात घेऊन देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी आठल्ये-सप्रे-पित्रे आणि अरुंधती पाध्ये इंग्लिश मिडीयमची इमारतच उपलब्ध करून दिली.

देवरुख महाविद्यालयाच्या परिसरात आता सुमारे ३०० बेड्‌स कोविड सेंटरकरिता तैनात ठेवण्यात आले आहेत. याकरिता माजी मंत्री रवींद्र माने यांनी २५० बेड्‌स दिले आहेत, तर आमदार शेखर निकम यांनी ऑक्सिमीटर आणि थर्मल गन उपलब्ध करून दिले आहे. वनाझ इंजिनिअर कंपनीकडून ५० बेड्‌स देण्यात आले आहेत.

कोविड सेंटरमधील रुग्णांना सकस आहार मिळावा, यासाठी उद्योजक उदय लोध यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. कोविड सेंटरकरिता अन्य सुविधा देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, देवरुख नगरपंचायत यांचीही मदत होत आहे.

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ग्राम कृती समित्यांनीही सजग राहून आपली भूमिका पार पाडावी. खरे तर ग्राम कृती दलाच्या सहकार्यामुळेच कोरोनाला आळा बसवता आला आहे, असे थोरात यांनी स्पष्ट केले.

...............................

फोटो:

देवरुख येथे कोविड सेंटर सज्ज ठेवण्यात आले आहे. (छाया : सचिन मोहिते)