रत्नागिरी : कोंबडीला खाणाऱ्या अजगराला मारून त्याला अर्धवट जाळल्याप्रकरणी नाटे पडवणेकरवाडी येथील तिघांना वनविभागाने ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. यातील आरोपी विजय पारकर (५३ वर्षे), वंदना पारकर (४४ वर्षे) आणि मानसी पारकर (२७ वर्षे) यांनी अजगराला जाळताना व्हिडीओ केला. तसेच अर्धवट जाळलेल्या या अजगराला व कोंबडीला गावातील ओढ्याजवळ नेऊन टाकले.आरोपींनी गुन्हा कबूल केला असून हा जाळलेला अजगरही वनविभागाने ताब्यात घेऊन त्याचे राजापूर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन केले आहे. ही कारवाइ विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी परिक्षेत्राच्या वनअधिकारी प्रियांका लगड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
कोंबडी खाणाऱ्या अजगराला जाळणाऱ्या कुटुंबावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 17:26 IST
Crimenews Forest Ratnagiri : कोंबडीला खाणाऱ्या अजगराला मारून त्याला अर्धवट जाळल्याप्रकरणी नाटे पडवणेकरवाडी येथील तिघांना वनविभागाने ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंबडी खाणाऱ्या अजगराला जाळणाऱ्या कुटुंबावर गुन्हा दाखल
ठळक मुद्देकोंबडी खाणाऱ्या अजगराला जाळणाऱ्या कुटुंबावर गुन्हा दाखलवनविभागाने केली कारवाइ