लांजा महाविद्यालयातर्फे ‘करियर कट्टा’चे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST2021-07-02T04:21:59+5:302021-07-02T04:21:59+5:30

लांजा : शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या कै. नाना वंजारे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी करियर कट्टाचे ...

‘Career Katta’ organized by Lanza College | लांजा महाविद्यालयातर्फे ‘करियर कट्टा’चे आयोजन

लांजा महाविद्यालयातर्फे ‘करियर कट्टा’चे आयोजन

लांजा : शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या कै. नाना वंजारे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी करियर कट्टाचे आयोजन करण्यात येणार आहे. महाविद्यालयीन युवकांच्या स्वप्नांना दिशा देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे ‘करियर कट्टा’ या उपक्रमाचे आयाेजन करण्यात येत आहे. त्यानुसार महाविद्यालयात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करियर कट्टा अंतर्गत ‘आय. ए. एस. आपल्या भेटीला’ आणि ‘उद्योजक आपल्या भेटीला’ हे दोन महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू झाले आहेत. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वर्षाचे ३६५ दिवस प्रत्येक दिवशी एक पाठ याप्रमाणे देशातील विविध भागातील आय. ए. एस., आय. पी. एस., आय. आर. एस., आय. एफ. एस. यांचे मार्गदर्शन ‘आय. ए. एस आपल्या भेटीला’ या उपक्रमाद्वारे होणार आहे. तसेच उद्योजक, बँकिंग अधिकारी, शासकीय योजना आणि व्यावसायिक सल्लागार यांच्या मुलाखती आणि त्यांचे मार्गदर्शन हे ‘उद्योजक आपल्या भेटीला’ या उपक्रमाद्वारे होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल तर अजूनही नोंदणी सुरू आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी प्रा. ऋषिकेश राजाराम सुर्वे यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: ‘Career Katta’ organized by Lanza College