शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार तुम्हीच ठरवा : उद्धव ठाकरेंची सूचना

By admin | Updated: October 20, 2016 01:00 IST

‘मातोश्री’वरून होणार घोषणा : रत्नागिरीतील नगराध्यक्ष निवडीचा सस्पेन्स कायम

रत्नागिरी : रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्षपद उमेदवारीसाठी शिवसेनेतील तीन इच्छुकांशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी चर्चा केली. या तिघांनीच नगराध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित करावा, असे सांगत ठाकरे यांनी चेंडू इच्छुकांच्याच कोर्टात टाकला आहे. त्यामुळे उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम असून, इच्छुक उमेदवारही चक्रावले आहेत. तीनही उमेदवार आग्रही असल्याने ‘मातोश्री’वरूनच २४ आॅक्टोबरपर्यंत उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रत्नागिरी नगरपरिषदेची निवडणूक २७ नोव्हेंबर २०१६ रोजी घोषित झाली आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास येत्या २४ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. राजकीय हालचालींना वेग आला आहे. यावेळी नगराध्यक्ष निवडणूक थेट पद्धतीने होणार आहे. उमेदवारीसाठी शिवसेनेत ‘कॉँटे की टक्कर’ आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी बुधवारी सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तिघा इच्छुकांना मुलाखतीसाठी बोलाविले होते. निमंत्रणानुसार उमेदवारीसाठी इच्छुक माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, नगरसेवक बंड्या साळवी व राहुल पंडित हे मंगळवारी रात्रीच मुंबईला रवाना झाले होते. बुधवारी दुपारी २.३० वाजल्यानंतर मातोश्री बंगल्यावर या तिघांशी ठाकरे यांनी चर्चा केली. ठाकरे यांनी तिघांचीही ओळख करून घेतली. कोणाला अंतिम उमेदवारी द्यावी, याचा निर्णय या तिघांनीच आपापसांत चर्चा करून घ्यावा, असे ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे स्वतंत्र मुलाखतीविनाच या तीनही इच्छुकांना परत फिरावे लागले. या भेटीच्यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत व राजन साळवी तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी इच्छुकांच्या कोर्टात चेंडू टाकला असला तरी हे तिघेही उमेदवारीसाठी आग्रही आहेत. तिघांमध्ये सहमतीने एक नाव निश्चित होणे कठीण आहे. त्यामुळे २४ आॅक्टोबरपर्यंत सेना उमेदवाराचे नाव ‘मातोश्री’वरूनच घोषित होण्याची शक्यता आहे. आता उमेदवार या तिघांमधूून निवडणार की अन्य कुणा चौथ्याचे नशीब पालटणार, अशी चर्चाही रंगली आहे. (प्रतिनिधी) चौकट उमेदवार घोषणा टाळण्यामागे डावपेच? रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदासाठी अन्य पक्षांच्या उमेदवारांची नावेही अद्याप अधिकृतपणे घोषित झालेली नाहीत. राष्ट्रवादीतर्फे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये, तर भाजपतर्फे विद्यमान नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या नावांची चर्चा आहे. प्रत्येक पक्षाचे नेते दुसऱ्या पक्षातर्फे कोणत्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होते उमेदवारीसाठी इच्छुक माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, नगरसेवक बंड्या साळवी व राहुल पंडित हे मंगळवारी रात्रीच मुंबईला रवाना झाले होते. बुधवारी दुपारी २.३० वाजल्यानंतर मातोश्री बंगल्यावर या तिघांशी ठाकरे यांनी चर्चा केली. ठाकरे यांनी तिघांचीही ओळख करून घेतली. कोणाला अंतिम उमेदवारी द्यावी, याचा निर्णय या तिघांनीच आपापसांत चर्चा करून घ्यावा, असे ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे स्वतंत्र मुलाखतीविनाच या तीनही इच्छुकांना परत फिरावे लागले. या भेटीच्यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत व राजन साळवी तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी इच्छुकांच्या कोर्टात चेंडू टाकला असला तरी हे तिघेही उमेदवारीसाठी आग्रही आहेत. तिघांमध्ये सहमतीने एक नाव निश्चित होणे कठीण आहे. त्यामुळे २४ आॅक्टोबरपर्यंत सेना उमेदवाराचे नाव ‘मातोश्री’वरूनच घोषित होण्याची शक्यता आहे. आता उमेदवार या तिघांमधूून निवडणार की अन्य कुणा चौथ्याचे नशीब पालटणार, अशी चर्चाही रंगली आहे. (प्रतिनिधी)