शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

तिवंडेत नळजोडणी रद्द करा

By admin | Updated: August 12, 2015 23:11 IST

राष्ट्रवादीची मागणी : शहराबाहेर २४ तास पाणी ?

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन शहराच्या हद्दीबाहेरील बांधकाम विकासकाने उभारलेल्या ४१० सदनिकांना शीळ धरणाच्या जलवाहिनीवरून जोडणी देण्यात आली आहे. शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळत नसताना शहराबाहेर २४ तास पाणी देण्याचा हा निर्णयच चुकीचा व रत्नागिरी शहरवासीयांवर अन्याय करणारा आहे. ही जोडणी नियमबाह्य असून तातडीने रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे एका निवेदनाद्वारे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. रत्नागिरी नगरपरिषदेच्या पहिल्या सभेत तिवंडेवाडी या शहराच्या बाहेरील गावात असलेल्या खासगी विकासकाच्या ४१० सदनिका असलेल्या संकुलाला पाण्याची जोडणी देण्याच्या ठरावाला शिवसेनेने विरोध केला होता. तसे पत्रही नगराध्यक्षांना देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर इतिवृत्तात हा ठराव मंजूर असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे पुढील सभेत शिवसेनेने याला जोरदार आक्षेप घेत ठराव मंजूर करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे पत्र दिले होते. याबाबत योग्य भूमिका मांडता न आल्याने जिल्हा प्रशासनाकडूनही ही जोडणी मान्य झाली. मात्र, ही जोडणी चुकीच्या पध्दतीने देण्यात आली आहे, असे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे वस्तुस्थिती मांडण्यात आली नाही. त्यामुळे याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनीच पाहणी करून ही जोडणी रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. शहराला मुबलक पाणी मिळते, असे नगराध्यक्ष म्हणत असतील तर एमआयडीसीकडून पाणी का घ्यावे लागते. विकासकाला दिलेल्या या थेट जोडणीमुळे साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्रात पाणी येण्याचा वेग कमी होणार आहे. तसेच ४१० कुटुंबांनाही थेट जोडणीमुळे अशुध्द पाण्याचा पुरवठा होणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.नगरपरिषदेने ही जोडणी रद्द केली नाही तर आपण शांत बसणार नाही. रत्नागिरीत या जोडणीविरोधात नागरिकांची स्वाक्षरी मोहीम सुरू केली जाईल. जनतेच्या स्वाक्षरीने जोडणीला विरोध असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाईल, असेही या नेत्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)