रत्नागिरीत पुन्हा सापडले ब्राऊन शुगर; तरुण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 12:22 IST2024-10-15T12:22:16+5:302024-10-15T12:22:50+5:30

रत्नागिरी : ब्राऊन शुगरची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पाेलिसाने रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ३३,६०० रुपयांचे ४ ...

Brown sugar rediscovered in Ratnagiri; Young custody | रत्नागिरीत पुन्हा सापडले ब्राऊन शुगर; तरुण ताब्यात

रत्नागिरीत पुन्हा सापडले ब्राऊन शुगर; तरुण ताब्यात

रत्नागिरी : ब्राऊन शुगरची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पाेलिसाने रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ३३,६०० रुपयांचे ४ ग्रॅम ब्राऊन हेराॅईन जप्त करण्यात आले असून, ही कारवाई रविवारी दुपारी निवखाेल राेड येथील एका हायस्कूलच्या मागे करण्यात आली.

इबादुल्ला मुजीब पावसकर (वय २६, रा. राजीवडा नाका, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी दुपारी १२:२५ वाजण्याच्या दरम्यान निवखाेल राेड येथील हायस्कूलच्या पाठीमागे इबादुल्ला पावसकर हा ब्राऊन हेराॅईन घेऊन उभा हाेता. याबाबतची माहिती पाेलिस हवालदार झाेरे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एका प्लास्टिक पिशवीत ब्राऊन हेराॅईन हा अमली पदार्थ सापडला. त्याचे वजन ४ ग्रॅम असून, त्याची किंमत ३३,६०० इतकी आहे. हा साठा पाेलिसांनी जप्त केला आहे.

Web Title: Brown sugar rediscovered in Ratnagiri; Young custody