शहरं
Join us  
Trending Stories
1
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
2
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
5
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
6
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
7
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
8
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
9
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
10
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
11
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
12
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
13
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
14
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
15
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
16
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
17
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
18
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
19
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भाजप जिल्ह्यात स्वबळावर लढणार

By admin | Updated: June 25, 2016 00:41 IST

बाळ माने : कार्यकारिणीची आजपासून दोन दिवस सभा

चिपळूण : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार आहे. आम्हाला कोणत्याही पक्षाबद्दल द्वेष नाही; परंतु केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. सध्या अनुकूल काळ आहे. हवामान चांगले असेल तर पीक चांगले येते, हा नियम आहे. आम्हाला चांगले वातावरण आहे. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढणार आहोत, अशा शब्दात भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. चिपळूणचा नगराध्यक्ष हा भाजपचाच होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
भारतीय जनता पक्षाची जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज, शनिवारी सायंकाळी ५ वाजता माटे-भोजने सभागृह कापसाळ कॉलनी येथे सुरू होणार आहे. यावेळी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणीचे ९१ पदाधिकारी, अल्पसंख्याक सेल, महिला मोर्चा, युवा मोर्चा यांचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व सरचिटणीस मिळून १५० पदाधिकारी या कार्यकारिणीला उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी माने यांनी चिपळूण येथे पत्रकार परिषद घेतली. बैठकीला कोकण विभाग संघटनमंत्री सतीश धोंड, जिल्हा प्रभारी प्रदेश चिटणीस राजन तेली, आमदार प्रवीण दरेकर, प्रदेश चिटणीस व माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्याबरोबर संपर्कमंत्री प्रकाश मेहता उपस्थित राहण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी महिला मोर्चाच्या सरचिटणीस नीलम गोंधळी, चिपळूण तालुकाध्यक्ष रामदास राणे, महिला तालुकाध्यक्षा मृणाल रावराणे, जिल्हा चिटणीस नंदू गोंधळी, महेश दीक्षित उपस्थित होते.
भाजप आता सत्तेत असून, दोन वर्षांच्या मोदी पर्वाच्या
काळात देशात विकासाची गंगा वाहत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, गुहागर-विजापूर मार्गाचे रुंदीकरण ही कामे गती घेत आहेत. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गाचा प्रश्नही मार्गी लागला आहे. भाजप येथे विकासकामांवर भर देत आहे, याची जाणीव कोकणवासीयांना आहे. आपण ज्यावेळी जिल्हाध्यक्ष झालो, तेव्हा पक्षाचे ४०० बूथ होते. आता ११०० बूथ तयार झाले आहेत. शतप्रतिशत भाजपचा नारा देत लवकरच १६५० पेक्षा जास्त बूथ पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संघटनात्मक कामाला गती आल्यामुळे पक्षाला फायदा होईल. आतापर्यंत आम्ही तडजोडीचे राजकारण केले. त्यामुळे भाजप तळागाळापर्यंत पोहोचू शकला नाही. परंतु, आता एक नवी जबाबदारी घेऊन आम्ही चाललो आहोत. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यकारिणीत चांगले निर्णय होतील. त्याचा पक्षाला फायदा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)