देवरुखातील तीन पाेलिसांना पदक प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:25 IST2021-05-03T04:25:43+5:302021-05-03T04:25:43+5:30

देवरुख : महाराष्ट्रदिनी महासंचालक पोलीस पदकाने देवरुख पोलीस ठाण्यामधील तिघांचा जिल्हा पाेलीस मुख्यालयात सन्मान करण्यात आला. हेड कॉन्स्टेबल सचिन ...

Awarding medals to three Paelis of Devrukha | देवरुखातील तीन पाेलिसांना पदक प्रदान

देवरुखातील तीन पाेलिसांना पदक प्रदान

देवरुख : महाराष्ट्रदिनी महासंचालक पोलीस पदकाने देवरुख पोलीस ठाण्यामधील तिघांचा जिल्हा पाेलीस मुख्यालयात सन्मान करण्यात आला. हेड कॉन्स्टेबल सचिन सुरेश भुजबळराव, विजय देवजी मावलंकर, साहाय्यक पोलीस फौजदार संजय तुकाराम उकार्डे यांचा यामध्ये समावेश आहे.

महाराष्ट्र दिनाच्या दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील सुमारे २४ पोलिसांना रत्नागिरी येथे पदक प्रदान करण्यात आले. पंधरा वर्षे सुरक्षित सेवा देत चांगली कामगिरी केल्यामुळे या तिघांना हे पदक प्रदान करण्यात आले आहे. कार्यक्रमादरम्यान अतिरिक्त पाेलीस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपविभागीय पोलीस अधिकारी एस. एल. पाटील, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा व इतर अधिकारी उपस्थित होते. महासंचालक पोलीस पदकाने सन्मानित झाल्यानंतर या तिघांचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

Web Title: Awarding medals to three Paelis of Devrukha