शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी आशा सेविकांनी पुकारला एक दिवसाचा संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:33 IST

रत्नागिरी : विविध मागण्यांसाठी आशा सेविकांनी शुक्रवारी एक दिवसाचा संप पुकारला होता. यावेळी महाराष्ट्र आशा वर्कर्स, गटप्रवर्तक व आरोग्य ...

रत्नागिरी : विविध मागण्यांसाठी आशा सेविकांनी शुक्रवारी एक दिवसाचा संप पुकारला होता. यावेळी महाराष्ट्र आशा वर्कर्स, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेकडून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

स्वत:चा जीव धोक्यात घालून इतर रुग्णांसह कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करणाऱ्या राज्यातील सर्व आशा, गटप्रवर्तक व कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना १ सप्टेंबर, २०२१ पासून रद्द केलेला कोविड-१९ प्रोत्साहन भत्ता सुरू करण्यात यावा, अन्यथा जोपर्यंत हा भत्ता देणार नाहीत, तोपर्यंत त्या कोविडचे काम करणार नाहीत, असा इशारा या संघटनेकडून देण्यात आला होता. तसेच १ एप्रिल, २०२१ पासून आशा व गटप्रवर्तक महिलांचे सर्व थकीत मानधन व मोबदला त्वरित मिळावा. २३ जून, २०२१ रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आरोग्यवर्धिनीअंतर्गत ज्याठिकाणी अद्याप सीएचओ नेमलेले नाहीत, त्यांची नेमणूक करावी. तसेच नेमणूक होत नाहीत तोपर्यंत त्या ठिकाणच्या आशांना आरोग्यवर्धिनी कामाचे १ हजार रुपये दरमहा मागील फरकासहीत मिळावेत, सन २००२ सालापासून राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू असल्याने व सद्यस्थिती विचारात घेता, हा प्रकल्प सुरू राहत असल्याने आशा व गटप्रवर्तकांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी, कर्तव्य बजावत असताना कोरोनाची बाधा झाल्यास १० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, कामगारविरोधी श्रमसंहिता रद्द करा, सर्व योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, अशा विविध मागण्यांचा या निवेदनामध्ये समावेश होता.

यावेळी महाराष्ट्र आशा वर्कर्स, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शंकर पुजारी, पी. पी. पारकर, विद्द्या भालेकर, संजीवनी तिवरेकर, सुप्रिया गवाणकर, गीतांजली जाधव, नयना गोसावी, रेश्मा कदम व अन्य आशा सेविका जिल्हा परिषदेसमोर उपस्थित होत्या.