शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अरुण मोर्ये यांचा प्रश्न राज्यात प्रथम

By admin | Updated: November 4, 2015 00:08 IST

पीक परिसंवाद २०१५ : खंडाळा येथील १२ शेतकऱ्यांचा सहभाग

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य कृ षी विभाग आणि मुंबई दूरदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सगुणा बाग कर्जत, जि. रायगड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘पीक परिसंवाद २०१५’ या शेतीविषयक कार्यक्रमात खंडाळा - सत्कोंडी येथील प्रगतशील शेतकरी अरुण मोर्ये यांच्या प्रश्नाने प्रथम क्रमांक पटकावला.रायगड येथे आयोजित करण्यात आलेल्या या पीक परिसंवादात कोकणातील शेतकरी सहभागी झाले होते. दक्षिण कोकणातील लाल मातीत शासकीय माती परीक्षण अहवालानुसार कोणती फुलशेती करावी? कोकणातील हवामानाचा, आर्द्रतेचा सदर फुलशेतीवर कोणता परिणाम होईल? व यासाठी शासकीय योजना कोणत्या? या प्रश्नाला प्रथम क्रमांक मिळाला. या प्रश्नाबद्दल मुंबई दूरदर्शनचे डेप्युटी जनरल मॅनेजर शिवाजी कुळसुंदकर यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला कृषी आयुक्त विकास देशमुख प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. दापोली कृषी विद्यापीठाचे सुभाष चव्हाण, राहुरी कृषी विद्यापीठाचे डॉ. डी. डी. पवार, शेतीतज्ज्ञ व कृषिभूषण पुरस्कारप्राप्त चंद्रशेखर भडसावळे, दूरदर्शनचे डी. जी. एम. शिवाजी कुळसुंदकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभली होती.खंडाळा आणि परिसरातून जेएसडब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून कंपनीचे अधिकारी गणेश घोडके आणि सुधीर तेलंग यांनी या परिसंवादासाठी १२ शेतकऱ्यांचा सहभाग नोंदवला होता. यामध्ये चाफेरीचे उपसरपंच आणि प्रगतशील शेतकरी दीपक बैकर, अरुण मोर्ये, सतीश थुळ, उदय जोग यांच्यासह १२ शेतकरी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि मुंबई दूरदर्शनतर्फे परिसंवादाचे आयोजन.पीक परिसंवाद २०१५ मध्ये राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांचा सहभाग होता.रत्नागिरी तालुक्यातील सत्कोंडी - खंडाळा येथील शेतकऱ्यांचाही परिसंवादात सहभाग.प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या अरूण मोर्ये यांचा सत्कार.